शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अतिधोकादायक इमारतींची संख्या १0३

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:55 IST

ठाणे महापालिकेच्या हद्दीत गतवर्षी अतिधोकादायक असलेल्या ९५ इमारतींच्या यादीत आणखी ८ इमारती भर पडल्याने ही संख्या यावर्षी १०३ वर गेली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत गतवर्षी अतिधोकादायक असलेल्या ९५ इमारतींच्या यादीत आणखी ८ इमारती भर पडल्याने ही संख्या यावर्षी १०३ वर गेली आहे. यामध्ये कोपरी आणि नौपाडा या प्रभाग समितीमध्ये ४६ अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. तर अतिधोकादायक इमारती या जुन्या ठाणे शहरात जास्त आहेत. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने या सर्व अतिधोकादायक इमारती येत्या ३१ मे पर्यंत खाली करण्यात येतील, असे म्हटले आहे. यामुळे या इमारतींत राहणाऱ्या शेकडो रहिवाशांवर ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ येणार आहे. शिवाय शहरात धोकादायक इमारतींची संख्याही ४ हजार ५०७ इतकी असून त्यामध्ये सर्वात जास्त मुंब्रा-कळवा, वागळे इस्टेट या परिसरात आहेत. तर येत्या काही वर्षांत ही वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहेलोकसभा निवडणुकीच्या कालावधीत महापालिकेचे सर्वच विभाग निवडणूक कामकाजाच व्यस्त होते. ज्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, ते सर्व्हेक्षण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले. त्यानुसार शहरात १०३ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. गेल्यावर्षी हा आकडा ९५ होता. त्यामध्ये सर्वात अधिक अतिधोकादायक इमारती ठाणे शहरात म्हणजे कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती परिसरात आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही प्रभाग समितीत अतिधोकादायक इमारतीची संख्या ३७ होती ती आता ४५ वर गेली आहे.संघर्ष होण्याची शक्यताअतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी महापालिकेने ३१ मे ची डेडलाइन दिली आहे. यामुळे या इमारतींत राहणाºया शेकडो कुंटुंबावर बेघर होण्याची वेळ येणार आहे. शहरात इतक्या मोठ्याप्रमाणात संक्रमण शिबिरे नसल्याने महापालिका व या रहिवाशांतील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. अतिधोकादायक इमारतींची संख्या कोपरी आणि नौपाडा भागात जास्त आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका