ठाणे : क्लस्टरसारख्या योजनांबरोबर लवकर ठाण्यात बॅटरीवरील १०० बसेस येणार असल्याची घोषणा करताना ठाणेकरांसाठी भविष्यातही लोकोपयोगी उपक्रम महापालिका हाती घेईल, अशी माहिती ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या ३३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात राम गणेश गडकरी रंगायतन येथे बोलताना दिली.या वेळी ठाणे शहराच्या विकासाबरोबरच समाजासाठी योगदान देणाऱ्या ठाणेकरांना ठाणे-भूषण, ठाणे-गौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी २०१४ आणि २०१५ या दोन्ही सालांमधील ठाणे-भूषण, ठाणे-गौरव आणि ठाणे-गुणीजन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते डॉ. वि. जोशी / डॉ. स्मिता जोशी, कृष्णकुमार कोळी, वसंत मराठे, मोहन गंधे, वसंत मोरे, अॅड. सदानंद भिसे, अनिल कुलकर्णी, लक्ष्मण मुर्डेश्वर, व्ही.के. वानखेडे सर, सुरेंद्र दिघे, अॅड. बाबा चिटणीस, श्रीमती बर्नेडेट पिमेंटा, अॅड. राम आपटे, रवी पटवर्धन, नारायण तांबे आणि मनोहर साळुंखे यांचा ठाणे-भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभानंतर सायंकाळी रूतबा या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले.सकाळी महापालिका मुख्यालय येथे महापौर संजय मोरे यांच्या हस्ते आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब यांच्या उपस्थितीत महापालिका ध्वजाचे ध्वजारोहण केले. या वेळी उपमहापौर राजेंद्र साप्ते, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती संभाजी पंडित, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्ष हिराकांत फर्डे, काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर, अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
ठाण्यात येणार बॅटरीवरील १०० बसेस
By admin | Updated: October 1, 2015 23:38 IST