शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

आरटीईच्या १० हजार जागा रिक्त, शिक्षण विभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:31 IST

मोठमोठ्या रकमांच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंतांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलामुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे.

ठाणे : मोठमोठ्या रकमांच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंतांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलामुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले. तिसºया फेरीअखेरच्या या प्रवेशानंतरही जिल्हाभरात अजून १० हजार २५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी येत्या दोन दिवसांत चौथ्या फेरीद्वारे प्रवेश देण्याचे प्रयत्न आहेत.प्ले ग्रुप, प्री-केजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणांतून बालकांना मोफत प्रवेश मिळत आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाºया ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तिसºया फेरीद्वारे निवड केलेल्या ९३९ पैकी आतापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे. संबंधित शाळांत हे प्रवेश झाले आहेत. मात्र, त्यांनी आॅनलाइन अपडेट केले नाही. येत्या दोन दिवसांत या प्रवेशांचे अपडेट व पुन्हा चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होईल, असा शिक्षण विभागाचा दावा आहे.>पालक व शाळांमध्येशाब्दिक चकमकीजागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणामुळे काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारत आहे, तर काही वेळा विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रुटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगली वागणूक न देता अपमानित करण्याचादेखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत. शाळेतील साहित्य, गणवेश, स्कूलबस प्रवास आदी शुल्कांबाबतदेखील पालक व शाळांमध्ये शाब्दिक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहे. काहींकडे मोबाइल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्यादेखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.>त्रुटी काढत शाळांची प्रवेशास टाळाटाळआधीच्या दोन फेºयांद्वारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिसºया फेरीअखेर ९३९ निवड केलेल्यांपैकी प्ले ग्रुपसाठी १० विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. तर, प्री-केजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थी, ज्यु.के.जी.साठी ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. याप्रमाणेच सिनिअर केजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गाकरिता ३८३ विद्यार्थ्यांना या तिसºया फेरीद्वारे प्रवेश देण्याचे नियोजन आहेत.पाल्यांचे प्रवेश वेळेत घेण्यासाठी पालकांना सतत सांगितले जात असल्याचे सांगितले जात आहे. पण, विविध कागदपत्रांसह अन्य त्रुटीच्या नावाखाली संबंधित शाळा हे प्रवेश देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या कमी दिसून येत आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा