शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीच्या पायाभूत चाचणीचे १० गुण अचानक घटले, शिक्षण खात्याची चूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:44 IST

पायाभूत चाचणी परीक्षेची सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ६० ऐवजी ५० गुणांचीच आल्याने शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे.

जान्हवी मोर्ये डोंबिवली : पायाभूत चाचणी परीक्षेची सातवीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका ६० ऐवजी ५० गुणांचीच आल्याने शिक्षकांचा गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे. लेखी आणि तोंडी (मौखिक) अशी ६० गुणांची प्रश्नपत्रिका आतापर्यंत होती. ती अचानक दहा गुणांनी कमी झाल्याचे शाळांनी लक्षात आणून दिल्यावर शिक्षण खात्याने चूक सुधारण काही प्रश्नांचे गुण वाढून त्याची भरपाई करून हा घोळ निस्तरण्याचा प्रयत्न केला आहे.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मराठी, विज्ञान, गणित आणि इंग्रजी या चार विषयांची पायाभूत चाचणी ८ नोव्हेंबरपासून सुरू आहे. आजवर ५० गुण लेखी परीक्षेचे आणि १० गुण मौखिक अशी विभागणी होती. पण सातवीची इंग्रजी विषयाची प्रश्नपात्रिका ६० गुणांऐवजी ५० गुणांची आली. त्यात ४० गुण लेखी परीक्षेचे व १० गुण मौखिक अशी रचना आहे. परीक्षा सुरु असताना हा प्रकार समोर आल्याने गोंधळ उडाला.याविषयी काही शाळांनी शिक्षण खात्याच्या विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील मगर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा शिक्षण खात्याने त्यांच्याकडून झालेली चूक मान्य केली. तसेच सुधारित गुण दिले जातील, असे सांगितले.तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी वेगवेगळ््या वयोगटातील असल्याने त्यांना सारखेच शब्द, सारखेच उतारे, सारखेच प्रश्न व सारखीच गोष्ट असलेली प्रश्नपत्रिका देण्यासही काही शिक्षकांनी आक्षेप घेतला.सातवीच्या इंग्रजीतील गुणांचा घोळ लक्षात आल्यावर सरकारने पत्रक काढले. प्रश्न क्रमांक दोन हा दोन गुणांऐवजी चार गुणांचा, प्रश्न क्रमांक तीन १६ ऐवजी २० गुणांचा, प्रश्न क्रमांक चार १४ ऐवजी १८ गुणांचा केला आहे. पहिल्या प्रश्नात आणइ तोंडी परीक्षेच्या गुणात मात्र बदल केलेला नाही.हे गुण वाढवून देणारे पत्रक सोशल मीडियावरून शाळांत पोचविले जात आहे. पण ते अनेक शाळांपर्यंत पोचलेले नाही.प्रश्नपत्रिकेत चूक हा शिक्षण खात्याचा अपमान असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी मांडले. ही प्रश्नपत्रिका तयार करणाºयांची विद्या प्राधिकरणाने चौकशी करावी आणि यातील दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा