शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमधील १० गुटखा विक्रेत्यांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

By धीरज परब | Updated: March 20, 2024 20:24 IST

पानटपरीच्या मूळ मालकांवर पोलीस कारवाई करणार का, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे . 

मीरारोड - अन्न व औषध प्रशासनाने  शासनाने बंदी घातलेला गुटखा व तंबाकू विकणाऱ्या पान टपरी चालकांवर मंगळवारी कारवाई करत १० पान टपरी चालकांना गुटखा साठ्यासह अटक केली आहे . या प्रकरणी भाईंदर , नवघर व मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पानटपरीच्या मूळ मालकांवर पोलीस कारवाई करणार का, या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे . 

मीरा भाईंदर मध्ये बंदी असलेला घातक असा गुटखा व सुगंधी तंबाकू आदींची उघडपणे विक्री होत असून पोलिसांचे हप्ते बांधलेले असल्याने गुटखा विक्रेते व तस्कर हे मोकाट असल्याचे आरोप होत असतात . 

दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव , प्रशांत पवार व भरत वसावे यांनी मंगळवार १९ मार्च रोजी मीरा भाईंदर मध्ये गुटखा विकणाऱ्या पान टपरी चालकांवर धाडी टाकल्या . या प्रकरणी मीरारोड , भाईंदर व नवघर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून १० आरोपीना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या कडून प्रतिबंधित गुटखा - पानमसाला व सुगंधी तंबाकू आदींचा साठा जप्त करण्यात आला आहे . 

भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत भरत वसावे यांच्या फिर्यादी वरून गुटखा विक्रेते आरोपी सदाशिव देवी प्रसाद विश्वकर्मा (३४ ) रा . हार्मोनियम बिल्डिंग, गीता नगर, भाईंदर पश्चिम ; अजय महादेव बहादुर ( ४० ) रा .  सिताराम अपार्टमेंट. फाटक मार्ग , गीता नगर व गजराज रामलखन चौरसिया ( ६० ) रा . श्री दुर्गा पराडकर भवन, गावदेवी मार्ग, भाईंदर गाव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला . तिघांना भाईंदर पोलिसांनी १९ मारच्या रात्री अटक केली आहे . 

मीरारोड पोलीस ठाण्यात माणिक जाधव यांच्या फिर्यादी वरून दाखल गुन्ह्यातील गुटखा विक्रेते सुनीलकुमार श्यामलाल चौरसिया ( वय ३२ ) रा .  पेणकर पाडा, मीरारोड ; मोनू जोखू चौरसिया (  वय ३१ ) रा . अरुणोदय बिल्डिंग, चंदन पार्क, भाईंदर पूर्व व मोहम्मद समीम अली हुसेन अन्सारी (वय ४० ) रा . सिनेमॅक्स थिएटर जवळ झोपडपट्टी,  मीरा रोड अशी अटक आरोपींची नावे आहेत

तर नवघर पोलीस ठाण्यात प्रशांत पवार यांनी  दाखल गुन्ह्यानुसार जैन बंगल्या जवळील नंदिनी पान शॉप चालक सुरज रामस्वरत चौरसिया (२९ ) रा . रश्मी हेतल, सिनेमॅक्स जवळ ; मोती नगर येथील हार हर महादेव पानशॉप चालक कृपाशंकर राजाराम चौरसिया (२८ ) रा . दया सदन, हनुमान मंदिर जवळ ; कल्याणी बार जवळील सोनू पानशॉप चालक अनुराग जिमीपाल सिंग ( २१ ) रा . मनीष कॉम्प्लेक्स, फाटक मार्ग , भाईंदर पूर्व व न्यू गोल्डन नेस्ट येथील महालक्ष्मी पानशॉप चालक राजेंद्र रामबच्चन चौरसिया ( २७ ) रा . महालक्ष्मी पान शॉप , सोनम सागर, न्यू गोल्डन नेस्ट अशी अटक आरोपींची नावे आहेत . 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर