शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे एक लाख ९८ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:49 IST

बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणाऱ्या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. संकेतस्थळावर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करुन एका भामटयाने ही फसवणूक केली.

ठळक मुद्देबुलढाणा येथील डॉक्टरला गंडासंकेतस्थळावर दिली होती जाहिरात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे : संकेतस्थळावर खासगी साइटवर जाहिरात देऊन कारची बनावट कागदपत्रांद्वारे विक्री करून बुलडाणा येथील डॉ. प्रदीप डाबेराव यांची एक लाख ९८ हजारांची फसवणूक करणा-या पृथ्वी अमिन याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.दंतचिकित्सक डॉ. डाबेराव यांचा उंद्री (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथे दवाखाना आहे. नेहमीच बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे त्यांना जुनी कार खरेदी करायची होती. त्यासाठी ओएलएक्स या इंटरनेट साइटवर अशा कारचा ते शोध घेत होते. त्याचवेळी त्यांना एका टोयोटो कारची जाहिरात पाहायला मिळाली. २०१६ चे मॉडेल असलेल्या या कारची किंमत तीन लाख ७५ हजार रुपये दाखवण्यात आली होती. ती पसंत पडल्याने त्यांनी या कारच्या मालकाशी ओएलक्सच्या खात्यावर संपर्क साधला. २७ डिसेंबर २०१८ पासून त्यांच्यात या व्यवहाराची बोलणी सुरूझाली. पृथ्वी अमिन असे आपले नाव सांगणाºया या व्यक्तीने आपण ठाण्यातील आर मॉल येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. नंतर, या गाडीची किंमत त्याने दोन लाख ७५ हजार रुपये सांगून ती ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी विक्री करायची असून पैसे रोखीमध्ये घेणार असल्याचेही सांगितले. ही गाडी घेण्यासाठी त्याने त्यांना ३१ डिसेंबर रोजी ठाण्यात बोलवले. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर डॉ. डाबेराव हे त्यांचे मित्र स्वप्नील कोतवाल, मेकॅनिक अमोल गुजर हे दुपारी १२.४५ वा. पोहोचले. तिथे आर मॉलसमोर पृथ्वी याने ग्रे रंगाची इटिओस लिव्हा ही कार दाखवली. ती योग्य वाटल्यानंतर कागदपत्रे पाहून त्याला एक लाख ९८ हजार रुपये दिले. ती कार घेऊन ते १ जानेवारी २०१९ रोजी बुलडाणा येथे पोहोचले. त्यांनी जमा केलेली कारची कागदपत्रे बनावट असल्याचे ठाणे आरटीओ कार्यालयाकडून त्यांना काही दिवसांनी समजले. त्यानंतर, त्यांनी ७ जानेवारी रोजी ठाण्यातील पृथ्वीचा शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता आणि कागदपत्रेही बनावट आढळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २० जानेवारी रोजी एक लाख ९८ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी