शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मानसरोवर ,फुलेनगर येथील नागरी समस्यांविरोधात भाजपाची निदर्शने

By नितीन पंडित | Updated: January 20, 2023 14:53 IST

या भागातील फेणे पाडा येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडचा विषय गंभीर असून तेथे खाजगी व्यक्ती कडून वराह पालन व्यवसाय केला जात आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

भिवंडी :  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील मानसरोवर,फुलेनगर,फेणे पाडा या भागातील नागरी समस्यांबाबत पालिका आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करून ही प्रशासन लक्ष देत नसल्याने भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक शाम अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी स्थानिकांनी मानसरोवर महात्मा फुले चौक या ठिकाणी निदर्शने करून आपला निषेध नोंदवला आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, राजू गाजंगी, निष्काम भैरी, दीपक झा, सागर येल्ले यांच्यासह मानसरोवर, फेणेपाडा, फुलेनगर परिसरातील नागरीक, महिला व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या भागातील फेणे पाडा येथील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडचा विषय गंभीर असून तेथे खाजगी व्यक्ती कडून वराह पालन व्यवसाय केला जात आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर मानसरोवर परिसर,धापसी पाडा,गावदेवी मंदिर,फेणागांव, गणेश नगर आणि महात्मा ज्योतिबा फुले चौक ते कामतघर या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था असून गटार व पाथवेजची दुरावस्था झालेली आहे.या भागात अनेक ठिकाणी गटरी मधील सांडपाणी आणि गाळ रस्त्यावर येत आहे ज्यामुळे दुर्गंधी पसरत असून रस्त्यावरून चालतांना त्रास होतो.तसेच परिसरातील डाईंग आणि सायझिंग मधून बाहेर पडणारा धूर यामुळे मानसरोवर परिसरात नागरीकांच्या आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

मनपा प्रशासनास याबाबत वारंवार निवेदने व तक्रारी केल्या नंतरही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाम अग्रवाल यांनी दिली. तर येत्या महिना भरात न केल्यास कोणतीही सूचना न देता पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी यावेळी दिला. पालिका प्रशासनाच्या वतीने उपायुक्त दीपक झिंजाड यांनी निदर्शन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारीत या नागरी समस्यांची सोडवणूक करण्यसाठी तातडीने पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त परिसरात ठेवला होता.

टॅग्स :bhiwandiभिवंडी