शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

डब्ल्यूटीए टेनिस : सबीना शारिपोवाचा खळबळजनक विजय, तिस-या मानांकीत यानीना विकमायेरचा केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 22:32 IST

उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. 

मुंबई : उझबेकिस्तानच्या सबीना शारिपोवा हिने अनपेक्षित निकालाची नोंद करताना मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सबीनाने तिस-या मानांकीत बेल्जियमच्या यानीना विकमायेर हिचा पराभव करत स्पर्धेत खळबळ माजवली. चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या लढतीत जागतिक क्रमवारीत १९६व्या स्थानी असलेल्या सबीनाने जबरदस्त झुंजार विजय मिळवताना जागतिक क्रमवारीतील माजी १२व्या स्थानावरील विकमायेरला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. एक तास ५६ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात सबीनाने ३-६, ६-४, ६-२ अशी शानदार बाजी मारली. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सबीनाने अप्रतिम खेळ करताना आपल्याहून सरस असलेल्या विकमायेरला धक्का दिला. पुढील फेरीत सबीनापुढे डालिला जाकुपोविचचे कडवे आव्हान असेल. डालिलाने दणदणीत विजय मिळवताना फ्रान्सच्या एलिज जिमचा ६-३, ६-१ असा फडशा पाडून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, दुहेरी गटात करमन कौर थंडी - प्रांजला यदलापल्ली या भारतीय जोडीला स्लोवाकियाच्या जाकुपोविच आणि रशियाच्या इरीना ख्रोमाचेवा यांच्याविरुद्ध गुरुवारी रात्री पराभवाचा सामना करावा लागला.  या पराभवासह दुहेरी गटात यजमान भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, एकेरीमध्ये भारताच्या सर्व आशा आता अंकिता रैनावर अवलंबून आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा