शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2018 : राफा’ची तिसऱ्या  फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:31 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू दिग्गज राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना कझाखस्तानच्या मिखाइल कुकूशकिन याला सरळ तीन सेटमध्ये नमविले.

ठळक मुद्देमहिलांमध्ये जर्मनीच्या अँजोलिका कर्बेरने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत विजयी कूच केली.

लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू दिग्गज राफेल नदालने विम्बल्डन स्पर्धेची तिसरी फेरी गाठताना कझाखस्तानच्या मिखाइल कुकूशकिन याला सरळ तीन सेटमध्ये नमविले. त्याचवेळी सध्या आपला जुना फॉर्म मिळवण्यासाठी झगडत असलेला स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंका आणि मारिन सिलिच यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. महिलांमध्ये जर्मनीच्या अँजोलिका कर्बेरने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत विजयी कूच केली. १७ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने आतापर्यंत दोनवेळा विम्बल्डन जेतेपद उंचावले आहे. दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या नदालने गेल्या दीड वर्षात तीन ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली असून यात दोन फ्रेंच आणि एक अमेरिकन जेतेपदाचा समावेश आहे. नदालने जबरदस्त आक्रमक खेळ करताना मिखाइलचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. तगड्या नदालपुढे मिखाइलने क्वचितच आव्हान उभे केले. त्याचवेळी जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या क्रोएशियाच्या मरिन सिलिचला दुसºया फेरीतच पराभवाचा धक्का बसला. अर्जेंटिनाच्या गिडो पेला याने ३ तास १३ मिनिटांच्या अटीतटीच्या लढतीत आपल्याहून वरचढ असलेल्या सिलिचला ३-६, १-६, ६-४, ७-६(७-३), ७-५ असे पराभूत केले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर पेलाने जबरदस्त पुनरागमन करताना आश्चर्यकारकपणे विजय मिळवला. 

दुसरीकडे, स्टार खेळाडू स्टॅन वावरिंकालाही दुसºया फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला. इटलीच्या थॉमस फॅबिनो याने सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना वावरिंकाचे आव्हान ७-६(९-७), ६-३, ७-६(८-६) असे संपुष्टात आणले. याआधी जर्मनीचा अलेक्झांद्र झ्वेरेव, आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम, स्पेनचा डेव्हिड फेरर यांनाही सुरुवातीच्या फेरीतून बाहेर पडावे लागल्याने यंदाची विम्बल्डन धक्कादायक निकालांनी गाजत आहे. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनेही तिसऱ्या फेरीत कूच केली असून त्याने अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस याला ६-१, ६-२, ६-३ असे पराभूत केले. 

महिलांमध्ये जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू अँजोलिका कर्बेरने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत अमेरिकेच्या क्लेर लियूला नमविले. लियूने पहिला सेट जिंकत आश्चर्यकारक आघाडी घेतली. यावेळी आणखी एक अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र, अनुभवी कर्बेरने जबरदस्त मुसंडी मारताना सलग दोन सेट जिंकत ३-६, ६-२, ६-४ असा विजय मिळवून लियूला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. अव्वल खेळाडू रुमानियाच्या सिमोना हालेपनेही विजयी कूच करताना चीनच्या सैसै झेंग हिचा ७-५, ६-० असा धुव्वा उडवला.

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिस