शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Wimbledon 2018 : फेडररचा सलग दुसरा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 22:32 IST

दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये माजी विजेती मारिया शारापोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. 

ठळक मुद्देमारिया शारापोवा पहिल्याच फेरीत गारद

लंडन : दिग्गज रॉजर फेडररने अपेक्षित कामगिरी करताना स्लोवाकियाच्या लुकास लॅको याचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवत विम्बल्डन स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. केवळ १ तास ३० मिनिटांमध्ये बाजी मारताना फेडररने लॅकोला टेनिसचे धडेच दिले. त्याचवेळी, महिला गटामध्ये माजी विजेती मारिया शारापोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. 

विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम आणि नवव्या विम्बल्डन जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने ग्रास कोर्टवरील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना दिमाखदार विजय मिळवला. त्याने लॅकोचे आव्हान ६-४, ६-४, ६-१ असे सहजपणे परतावले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात फेडररने तब्बल १६ एस मारताना लॅकोवर पूर्ण वर्चस्व मिळवले. त्याउलट लॅकोला केवळ ६ एस मारण्यात यश आले. शिवाय दबावाखाली आल्यानंतर लॅकोकडून चारवेळा डबल फॉल्टही झाले. फेडररच्या झंझावातापुढे लॅकोला आव्हानही उभे करता आले नाही. कॅनडाच्या मिलोस राओनिच यानेही अपेक्षित आगेकूच करताना आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनचे आव्हान ७-६(७-४), ७-६(७-४), ७-६(७-४) असे परतावले.  सर्बियाचा दिग्गज खेळाडू नोव्हाक जोकोविच यानेही विजयी सलामी देताना अमेरिकेच्या टेनीस सेंडग्रेनचा ६-३, ६-१, ६-२ असा पराभव केला. महिलांमध्ये रशियाच्या मारिया शारापोवाला आपल्याच देशाच्या वितालिया दियाचेनको हिच्याविरुद्ध पराभूत व्हावे लागले. तीन तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत वितालियाने स्टार खेळाडू शारापोवाला ६-७(३-७), ७-६(७-३), ६-४ असा धक्का दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये शारापोवाची ग्रँडस्लॅममध्ये ही सर्वात वाईट कामगिरी आहे.  माजी विजेती झेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्वितोवाचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तिला बेलारुसच्या अलेक्झांद्रा सासनोविचने ६-४, ४-६, ६-० असे नमविले.  

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनRoger fedrerरॉजर फेडररmaria sharapovaमारिया शारापोव्हाSportsक्रीडा