शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

Wimbledon 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 01:00 IST

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली.

लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात जवळपास साडे सहा तास मॅरेथॉन लढत रंगली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अँडरसनने  7-6(6),  6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने बाजी मारली.  विम्बल्डनच्या इतिहासातील एकेरीमधील ही  सर्वाधिक काळ चाललेली उपांत्य लढत ठरली.  

 

विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रथमच प्रवेश करणा-या केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला नमवणा-या दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने पहिला गेम टायब्रेकरमध्ये घेतला, परंतु अमेरिकेच्या इस्नरने पुढील दोन्ही गेम जिंकताना सामन्यात मुसंडी मारली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले. तिसरा सेट टायब्रेकरमध्ये 11-9 असा लांबला. इस्नरने 0-1 अशा पिछाडीवरून 6-7 (8-6), 7-6 (7-5), 7-6 (11-9) अशी 2-1 ने आघाडी घेतली. चौथा सेट सुरू होण्यापूर्वी इस्नरकडे 2-1 अशी आघाडी असल्याने त्याचे पारडे जड मानले जात होते. मात्र, फेडररला झुंजवणा-या अँडरसनने हा सेट 6-4 असा सहज घेताना चुरस वाढवली. पाचवा आणि निर्णायक सेटमध्ये दोघांनीही तुल्यबळ खेळ केला. त्यात अँडरसनने  7-6(6),  6-7(5), 6-7(9), 6-4, 26-24 अशा फरकाने  विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. 

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिस