शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फेडररला कोण म्हणाले, 'एकदातरी आम्हाला जिंकू द्या!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 14:38 IST

... आणि उपस्थितांना हसू आवरत नव्हते.

ललित झांबरे :  " तुम्हाला बघून बघून आम्ही थकलोय, पण आम्ही काय करु शकतो!  विशेषतः तुम्हाला (फेडररकडे अंगुलीनिर्देश करत), तुम्ही तिशीचे काहीतरी आहात. तरीही का? पण का?"हॉपमन कप टेनिस स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात जर्मनीचा अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह बोलत होता आणि उपस्थितांना हसू आवरत नव्हते. सलग दुसऱ्या वर्षी जर्मन संघाला नमवत फेडररच्या स्वीस संघाने हॉपमन कप चौथ्यांदा जिंकल्यावर बक्षीस वितरण समारंभावेळी हे नाट्य बघायला मिळाले. 

झ्वेरेवचा हा कौतुकपर नाटकी संताप साहजिक होता कारण सलग दुसऱ्या वर्षी त्याला आणि जर्मन संघालाच नमवत फेडररने जर्मनीची हॉपमन कप जिंकण्याची संधी हुकवली होती आणि एरवीसुध्दा २० ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर असलेला हा खेळाडू ३७ वर्षे वयातही बहुतेक प्रमुख स्पर्धांत अ‍ॅलेक्झांडरसारख्या नव्या खेळाडूंचे आव्हान संपवत आलाय. त्यामुळे फेडरर, नदाल, जोकोवीच हेच खेळाडू जिंकत राहणार असतील तर आम्ही जिंकायचे केंव्हा, अशा अर्थाने अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवची उमटलेली ही प्रतिक्रिया होती. 

किमान एक, फक्त हॉपमन कप, एकदातरी आम्हाला जिंकू द्या, अशी गमतीशीर विनंतीही त्याने फेडररला केली. 

या साऱ्या प्रकारावेळी फेडररने शांत राहण्याचा आणि चेहरा निर्विकार ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण प्रयत्न करुनही त्याला आपले हसू रोखता आले नाही. तो म्हणाला की, मी हॉपमन कपच्या विक्रमी यशाने आनंदीत आहे पण मी विक्रमांसाठी येथे खेळलो नाही. हा संपूर्ण आठवडाच भन्नाट राहिला. खूप मजा आली. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायचा मला अभिमान आहे आणि बेलिंडासोबत टीम छान जमलीये.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस