शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

शारापोवाचा उडाला धुव्वा; मुगुरुझाने केवळ ७० मिनिटांत मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:07 AM

स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली.

पॅरिस : स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझा हिने धमाकेदार विजयाची नोंद करताना स्टार खेळाडू रशियाच्या मारिया शारापोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह मुगुरुझाने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू रुमानियाच्या सिमोना हालेपने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना जर्मनीच्या अँजोलिका कर्बर हिचे कडवे आव्हान परतावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्यपूर्व सामन्याच्या काही मिनिटांअगओदर दुखापतीमुळे सेरेना विलियम्सनने शारापोवाविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर यावेळी शारापोवाला मोठ्या कालावधीनंतर ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी होती. मात्र, मुगुरुझाविरुद्ध ती आव्हानही निर्माण करु शकली नाही. मुगुरुझाने कमालीचे वर्चस्व राखताना केवळ ७० मिनिटांमध्ये बाजी मारत शारापोवाचा ६-२, ६-१ असा फडशा पाडला. मुगुरुझाचे वर्चस्व इतके जबरदस्त होते की, शारापोवाला सामन्यातील पहिला गेम जिंकण्यासाठी २९ मिनिटांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली आणि येथेच सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. शारापोवाला मुगुरुझाविरुद्ध एकही ब्रेक पॉइंट मिळवता आला नाही. यामुळे मानसिक खच्चीकरण झालेल्या शारापोवाकडून अनेक चुकाही झाल्या आणि त्याचा अचूक फायदा घेत मुगुरुझाने दणदणीत विजयासह आगेकूच केली. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी मुगुरुझाला बलाढ्य हालेपच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.त्याचबरोबर या पराभवासह कर्बरला एक अनोखा विक्रम नोंदवण्याची संधीही गमवावी लागली. जर कर्बरने हालेपविरुद्ध बाजी मारली असती, तर ती १९९९ नंतर स्टेफी ग्राफनंतरची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी पहिली जर्मन खेळाडू ठरली असती.दुसरीकडे अव्वल खेळाडू हालेपने अटीतटीच्या झालेल्या लढतीत पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी कर्बरचे कडवे आव्हान ६-७(२-७), ६-३, ६-२ असे परतावले. २ तास १४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यातील पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकून कर्बरने चांगली सुरुवात करत हालेपवर दडपण आणले. परंतु, यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या हालेपने वेगवान खेळाच्या जोरावर कर्बरला पुनरागमनाची संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)हालेप संधी साधणार का?जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सिमोना हालेपला अजूनही आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची प्रतीक्षा आहे. याआधी २०१४ आणि २०१७ साली तिने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण जेतेपदाला गवसणी घालण्यात तिला अपयश आले होते. आता, अंतिम फेरीसाठी तिला गर्बाइन मुगुरुझाच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. विशेष म्हणजे हालेपने तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. परंतु, मुगुरुझाने ज्याप्रकारे स्टार शारापोवाला लोळवले ते पाहता हालेपला विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

टॅग्स :Sportsक्रीडा