शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

सेरेनाचे विक्रमी ग्रँडस्लॅम स्वप्न पुन्हा भंगले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 19:56 IST

२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते.

न्यूयॉर्क : संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष ज्या विश्वविक्रमी क्षणाकडे लागले होते तो क्षण अखेर पुन्हा एकदा लांबला. अमेरिकेची दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्सला यूएस ओपन स्पर्धेत अनपेक्षितपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्याने तिला मार्गारेट कोर्टच्या विश्विविक्रमी २४ जेतेपदांची बरोबरी करण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कॅनडाच्या १९ वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कू हिने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे आंद्रिस्कू कॅनडाची पहिली एकेरी ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरली.

२३ ग्रँडस्लॅम वेजेतेपद पटकावलेल्या सेरेनाला संभाव्य विजेती मानले जात होते. किंबहुना तिचे २४वे जेतेपद जवळपास निश्चित मानले गेले होते, मात्र आंद्रिस्कूने दिग्गज सेरेनाच्या तगड्या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेताना ६-३, ७-५ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत बाजी मारली. यासह आंद्रिस्कू गेल्या १५ वर्षांतील सर्वात युवा खेळाडू ठरली. याआधी रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाने वयाच्या १९व्या वर्षीच यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते.

दुसरीकडे, सेरेनाला सलग चौथ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तसेच सलग दुसºया वर्षी सेरेनाला यूएस ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यामुळे तिच्या विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची उत्सुकता आणखी लांबली. यंदाच्या सत्रात आंद्रिस्कू जबरदस्त फॉर्ममध्ये असून ती आतापर्यंत अव्वल १० रँकिंगमध्ये असलेल्या ८ खेळाडूंविरुद्ध खेळली असून या सर्व लढतीत तिने बाजी मारली आहे. या शानदार जेतेपदासह आंद्रेस्कू जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेईल.सेरेनाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद १९९९ साली जिंकले होते. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यावेळी बियांका आंद्रिस्कूचा जन्मही झाला नव्हता.मला बियांका खूप आवडते, ती खूप चांगली मुलगी आहे. पण हा माझा स्पर्धेतील सर्वात वाईट खेळ होता. मी याहून अधिक चांगली खेळू शकली असती. बियांकाने शानदार खेळ करत मला दबावाखाली ठेवले. या स्तरावर माझे असे प्रदर्शन अत्यंत निराशाजनक आहे. २३ ग्रँडलॅम विजेत्या सेरेनाप्रमाणे आज मी नाही खेळली.- सेरेना विलियम्सगेल्या वर्षी मी स्पर्धेला पात्रही ठरु शकली नव्हती आणि नंतर दुखापतीमुळे मी घरी बसलेली. पण हे जीवनाचे चक्र आहे. नेहमीच वाईट किंवा चांगली वेळ राहत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने मेहनत करावी लागते. सेरेनाविरुद्ध अंतिम सामना खेळणे अद्भुत होते. हे माझे खूप जुने स्वप्न होते आणि मला हे स्वप्न पूर्ण होण्याचा विश्वास होता.- बियांका आंद्रिस्कू

टॅग्स :Tennisटेनिसserena williamsसेरेना विल्यम्स