शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्याला सानिया मिर्झानं दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 23:25 IST

सानियाच्या जबरदस्त उत्तराची ट्विटरवर चर्चा

नवी दिल्ली: टेनिसपटूसानिया मिर्झाला विनाकारण त्रास देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. 'रोमियो गोल्ड 2.0' नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरुन सानिया मिर्झाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक पाकिस्तानचा असल्यानं रोमियो गोल्ड 2.0 अकाऊंटवरुन मुद्दामहून पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या व्यक्तीला सानियानं जबरदस्त प्रत्युत्तर दिलं.पाकिस्तानी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्याला सानियानं सडेतोड उत्तर दिलं. 'माझा आणि माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन उद्या आहे. माझे पती आणि त्यांच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आज आहे. तुम्ही अतिशय संभ्रमात दिसत आहात. तुमचा स्वातंत्र्य दिन कधी आहे?' अशा शब्दांमध्ये सानियानं खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीला चोख उत्तर दिलं. सानियाच्या चाहत्यांनीही संबंधित व्यक्तीचा चांगलंच फैलावर घेतलं. यानंतर खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीनं रिप्लाय करणंच बंद केलं. 

 

सानिया मिर्झानं एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं. यानंतर सानियाला अनेकदा उलटसुलट प्रश्नांचा सामना करावा लागला. मात्र आपण भारतीय असून कायम भारतीयच राहू आणि भारतासाठीच खेळू, असं सानियानं स्पष्ट केलं. सानिया भारताकडून टेनिस खेळते. जगातील अग्रगण्य खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या सानियानं दुहेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाTennisटेनिसTwitterट्विटर