शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी सानिया मिर्झाला नामांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 04:19 IST

२००३ सालापासून भारतीय टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.

नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासाठी गुरुवारचा दिवस विशेष ठरला. २००३ सालापासून भारतीय टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.दखल घेण्याची बाब म्हणजे या पुरस्कारासाठी नामांकित झालेली सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आशिया-ओशियानिक विभागातून इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलिन नुग्रोहो हिच्यासह सानियाला नामांकन देण्यात आले आहे. सानियाने नुकतेच चार वर्षांनंतर फेड चषक स्पर्धेत पुनरागमन केले होते. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तिचा १८ महिन्यांचा मुलगा इजहानही उपस्थित होता.तीन विभागांतून एकूण सहा खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. युरोप-आफ्रिका विभागातून अ‍ॅनेट्ट कोंटावेट (इस्टोनिया) आणि एलेओनोरा मोलिनारो (लक्सेमबर्ग); अमेरिकन विभागातून पॅराग्वेच्या व्हेरोनिका केपेडे रॉय आणि मेक्सिकोच्या फर्नांडा कोट्रेरास गोमेज यांनाही नामांकन मिळाले आहे. या पुरस्काराचा विजेता निवडण्यासाठी १ ते ८ मे या कालावधीत मतदान होणार आहे. (वृत्तसंस्था)भारताला सर्वांत प्रथम फेडचषक स्पर्धेच्या प्ले आॅफमध्ये प्रवेश मिळवून देण्यात सानियाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.>अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या प्रसिद्धिपत्रकामध्ये सानियाने म्हटले की, ‘२००३ मध्ये मी पहिल्यांदा टीम इंडियाच्या जर्सीत कोर्टवर उतरली होती आणि तो दिवस माझ्यासाठी गौरवशाली होता. आतापर्यंत १८ वर्षांचा प्रवास झाला आहे. फेड चषकमध्ये आशिया-ओशियाना स्पर्धेतील मिळवलेला विजय हा आयुष्यातील सर्वांत मोठ्या यशापैकी एक आहे. मला फेड कप हार्ट पुरस्कारासाठी नामांकन दिल्याबद्दलआभारी. हा क्षण माझ्यासाठी खास आहे.’

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झा