शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

साकेत मायनेनीची विजयी सलामी; शशी कुमार मुकुंद, जेसन जूंग पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 1:48 AM

वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पुणे : वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेतआॅस्ट्रियाच्या सेबस्तियन आॅफनर याने दुसºया मानांकित बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सचा ५-७, ६-३, ६-१ गुणांनी तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.इटलीच्या सातव्या मानांकित जियालुइजी क्वेनजी याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या शशी कुमार मुकुंदचा ६-१, ६-१ गुणांनी एकतर्फी पराभव करून पात्रता फेरीच्या दुसºया चरणात प्रवेश केला. ब्राझीलच्या तिसºया मानांकित थायगो माँटेरोने जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्सचा टायब्रेकमध्ये७-६ (५), ७-५ असा पराभव करून आगेकूच केली.सविस्तर निकाल : पहिली पात्रता फेरी : साकेत मायनेनी (भारत) वि.वि.जेसन जूंग (तैपेई) ६-१, ५-७, ६-२; सेबस्तियन आॅफनर (आॅस्ट्रिया) वि. वि. रुबेन बेमेलमन्स (बेल्जियम) ५-७, ६-३, ६-१; जियालुइजी क्वेनजी (इटली) वि. वि. शशी कुमार मुकुंद (भारत) ६-१, ६-१; थायगो माँटेरो (ब्राझील) वि. वि. डॅनियल ब्रँड्स (जर्मनी)७-६ (५), ७-५; सिमॉन बोलेली (इटली) वि.वि. ब्रेडन चेन्यूर (कॅनडा) ६-३, ७-६ (५); अँटोनी हाँग (फ्रांस) वि. वि. आंद्रेज मार्टिन (स्लोव्हाकिया) ६-१, ६-२.पहिल्या फेरीत प्रजनेशसमोर मायकेलचे आव्हानभारताचा अव्वल मानांकित खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरणची एटीपी २५० वर्ल्ड टूर महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल मोह याच्याशी लढत होणार आहे.जागतिक क्र. १०३ असलेल्या प्रजनेश गुन्नेश्वरण आणि मायकेल मोह हे दोघेही (अलेक्झांडर वास्के टेनिस युनिव्हर्सिटी) या एकाच अकादमीत सराव करीत आहेत. पहिल्या फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या अर्जुन कढे याचा सामना लासलो जेरे याच्याशी, तर भारताच्या रामकुमार रामनाथन पुढे जागतिक क्र. ९७ असलेल्या मार्सेल ग्रनॉलर्सचे आव्हान असणार आहे.मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत केविन अँडरसन, हियोन चूँग, सिमॉन जाईल्स, मालेक झाजेरी या चार मानांकित खेळाडूंना पुढे चाल मिळाली आहे. दुहेरीत रोहन बोपन्ना-दिवीज शरण यांचा राडू अल्बोट-मालेज झाजेरी यांच्याशी, तर लिएंडर पेस व एम रियास वरेला यांचा सामना डी मरेरो व एच पॉडलिपिंक कॅस्टिलो या जोडीशी होणार आहे.मुख्य फेरीचा ड्रॉ पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, एटीपी सुपरवायझर मिरो ब्रातोव, एटीपी टूरचे व्यवस्थापक अर्नाऊ बृजेस, भारताचा प्रजनेश गुन्नेश्वरन, गतविजेता सिमॉन जाईल्स, आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Tennisटेनिस