शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मोठ्या मनाचा माणूस; दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर अन् त्याच्या पत्नीची कोट्यवधींची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 12:32 PM

जगातील दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी प्रत्येकी 8 कोटींची मदत केली.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे रोंजदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना धान्य पुरवले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात सरकारी यंत्रणाही अपूरी पडत आहे. अशा गरजूंसाठी क्रीडा विश्वातील अनेक मंडळींनी पुढाकार घेतला आहे. त्यात आणखी एका दिग्गजाचे नाव जोडले गेले आहे. ते म्हणजे टेनिससम्रातरॉजर फेडरर... पण, फेडररसह त्याची पत्नीही मदतीसाठी पुढे आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात 4 लाख 71,820 लोकं संक्रमित झाले आहेत. त्यापैकी 21, 297 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 लाख 14,703 लोकं बरी झाली आहेत.  या परिस्थितीमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे.  त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या जेवणाचे हाल झाले आहे. अशा लोकांसाठी फेडरर आणि त्याची पत्नी मिर्का यांनी 7 कोटींची मदत जाहीर केली. स्वित्झर्लंडमधील गरजूंना ही मदत पुरवली जाईल.

फेडररनं सोशल मीडियावर लिहीलं की,''प्रत्येकासाठी ही आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि कोणीही त्यातून वाचू शकत नाही. मिर्का आणि मी स्वित्झर्लंडमधील गरजूंसाठी एक मिलियन स्वीस फ्रान्स ( 7 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. गरजु कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणखी अनेक जण पुढे येतील, अशी आशा आहे. एकत्र येऊन आपण या परस्थितीवर मात करू शकतो. सुरक्षित राहा.''   यापूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हीचनेही सर्वांसाठी एक मॅसेज पोस्ट केला आहे. त्यानं लिहीलं की,''मी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. हा प्रत्येकासाठी आव्हानात्मक क्षण आहे. कृपया करून सर्वांनी घरीच थांबा.'' 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याRoger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस