शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदाल, रॉजर फेडरर यांची विजयी कूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 04:10 IST

जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

इंडियन वेल्स (अमेरिका) : जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररनेदेखील विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. इंडियन वेल्समध्ये तीन वेळेसच्या विजेत्या नदालने रविवारी अवघ्या ७२ मिनिटांत जेयर्ड डोनाल्डसन याचा ६-१, ६-१ असा पराभव केला. तो पुढील फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्ट्जमनशी लढेल. श्वार्ट्जमन याने स्पेनच्या रॉबर्टो कारबरेल्सवर ६-३, ६-१ अशा सेटने मात केली. फेडररने जर्मनीच्या पीटर गोजोविकविरुद्ध ६-३, ७-५ अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. दुसऱ्या फेरीच्या लढतीत गोजोविकने फेडररला कडवी झुंज दिली.फेडररचा पुढील फेरीतील सामना स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंका व हंगेरीचा २९ व्या मानांकित मार्टन फुकोविच यांच्यातील विजयीविरुद्ध होईल. अन्य लढतीत जपानच्या केई निशिकोरी याने फ्रान्सच्या एड्रियन मनारिनो याचा संघर्षपूर्ण लढतीत ६-४, ४-६, ७-६ असा पराभव केला. सामना बरोबरीत आल्यानंतर अंतिम सेटमध्ये निशिकोरीने टायब्रेकमध्ये बाजी मारली. पोलंडच्या हर्बर्ट हुरकाज याने फ्रान्सच्या लुकास पाउली याच्यावर ६-२, ३-६, ६-४ अशी मात केली. पुढील फेरीत निशिकोरी व हर्बर्ट आमने-सामने असतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालRoger fedrerरॉजर फेडरर