शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सानिया मिर्झाने उडवली पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 13:09 IST

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघासोबत दुबईत असलेला शोएबही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करत आहे. या दोन्ही 'लव्ह बर्ड'ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या प्रेम व्यक्त करण्याच्या स्टाईलची पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने कॉपी केली आणि सानिया मिर्झाने त्याची खिल्ली उडवली.

दोन दिवसांपूर्वी सानियाला सप्राईज देणारा एक व्हिडिओ शोएबने पोस्ट केला होता. 19 सेकंदाच्या या व्हिडिओत शोएबने सानियाला सप्राईझ लुकची भेट दिली होती आणि त्यावर सानियाही भलतीच खूश झाली होती. तिने त्वरित ते ट्विट रिट्विट करून शोएबला प्रेमाचा संदेश पाठवला होता. सानिया व शोएबच्या या प्रेम व्यक्त करण्याच्या स्टाईलमधून प्रेरणा घेत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूद यानेही आपल्या पत्नी इबाकला इम्प्रेस करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएबप्रमाणे अझरने पत्नी इबाकसाठी नवा सप्राईज लुकची भेट दिली. 'सगळे आपापल्या पत्नीला खूश करण्यासाठी सप्राईज देत आहेत, तर मी माझ्या पत्नीसाठीही काही करतो,'असा मॅसेज लिहून अझरने एक व्हिडिओ पोस्ट केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि सानिया मिर्झाने त्याची चांगलीच खिल्ली उडवली.

अझरची ती पोस्ट रिट्विट करून सानियाने असे धाडस केले नसते असा सल्ला दिला. ती म्हणाली,'' जर मी तुमच्या जागी असते आणि इबाक माझी पत्नी असती, तर असे धाडस मी केले नसते. तुम्हाला घरी जायचे आहे, हे लक्षात ठेवा.'' अर्थात हा सर्व मस्करीचा भाग होता, परंतु नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन होत आहे. 

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाPakistanपाकिस्तान