शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

ओसाकाचा अमेरिकन ओपन जेतेपदावर कब्जा, व्हिक्टोरिया अजारेंका पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:36 AM

जापानच्या ओसाका हिने बेलारुसच्या अजारेंकावर १-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. हे तिचे दुसरे अमेरिकन ओपन आणि एकूण तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे.

न्युयॉर्क : नाओमी ओसाका ने पहिल्या सेटमध्ये पिछाडीनंतर देखील जोरदार पुनरागममन करत व्हिक्टोरिया अजारेंकाला तीन सेटमध्ये पराभूत करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील विजेतेपद पटकावले.जापानच्या ओसाका हिने बेलारुसच्या अजारेंकावर १-६, ६-३, ६-३ असा विजय मिळवला. हे तिचे दुसरे अमेरिकन ओपन आणि एकूण तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे. पहिला सेट गमावल्यावर दुसऱ्या सेटमध्ये एका ब्रेकने पिछाडीवर असलेल्या ओसाकाने विजेतेपद पटकावल्यावर सांगितले की, ‘मी विचार केला की एक तासाच्या आतमध्ये सामना गमावणे खुपच लाजिरवाणे असेल. मला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा होता.’ ओसाकाने प्रयत्न केले आणि जोरदार पुनरागमन करताना विजेतेपद पटकावले.अमेरिकन ओपनमध्ये २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला खेळाडूने अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यावरही विजेतेपद पटकावले आहे. या आधी १९९४ मध्ये अरांत्जा सांचेज विकारियो हिने स्टेफी ग्राफ हिच्याविरुद्ध ही कामगिरी केली होती. २२ वर्षांच्या ओसाका हिचा जन्म जपानमध्ये झाला आहे. मात्र तीन वर्षांची असतानाच ती अमेरिकेत आली आणि आता कॅलिफोर्नियात राहत आहे.विजेतेपद पटकावण्यासोबत वांशिक भेदभावाविरोधात आवाज उचलण्याच्या इराद्यानेच ओसाका यंदाच्या स्पर्धेत खेळत होती. (वृत्तसंस्था)वंशभेदाविरोधातउठवला आवाजओसाकाने शनिवारचा सामना खेळताना तामिर राईसचे नाव लिहलेला मास्क परिधान केला होता. या १२ वर्षांच्या कृष्णवर्णिय मुलाला २०१४ मध्ये पोलिसांनी ठार केले होते. स्पर्धेदरम्यान हा सातवा मास्क होता. ज्यात हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कृष्णवर्णिय नागरिकांच्या सन्मानार्थ तिने हे मास्क वापरले होते. याआधी ब्रियोना टेलर, एलिजाह मॅकक्लेन, ट्रेवोन मार्टिन, अहमद आरबेरी, जॉर्ज फ्लाईड आणि फिलांडो कास्टिल यांचे नाव लिहलेले मास्क होते. ओसाका हिने सांगितले ‘ माझी फक्त हीच इच्छा होती की लोकांनी याबाबत चर्चा सुरू करावी.’ओसाकाचा सलग११ वा विजयबेलारुसची अजारेंका देखील तिसºया ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासाठी दावेदारी करत होती. कोविड १९ च्या ब्रेकनंतर खेळ पुन्हा सुरू झाल्यापासून ओसाकाचा हा सलग ११ वा विजय आहे. या आधी ओसाकाने २०१८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१९ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद मिळवले होते. अजारेंकाने २०१२ आणि २०१३ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.मी विजयाबाबत विचार करत नव्हते. मला फक्त कडवे आव्हान द्यायचे होते. अशाच प्रकारे मी विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरले. - ओसाका

टॅग्स :Tennisटेनिस