शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 10:22 IST

US Open 2020 : जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार नोव्हाक जोकोविकला स्पर्धेतून धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोर्टवर संतापाच्या भरात लाइन्सवुमनवर बॉल मारल्याने आयोजकांनी जोकोविकला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला जोकोविकला बाद करण्यात आल्याने स्पेनचे पाब्लो कार्रेनो बुस्टा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे

न्यूयॉर्क - पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाचा प्रबळ दावेदार नोव्हाक जोकोविकला स्पर्धेतून धक्कादायकरीत्या बाहेर पडावे लागले आहे. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कोर्टवर संतापाच्या भरात लाइन्सवुमनवर बॉल मारल्याने आयोजकांनी जोकोविकला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.सर्बियाचा स्टार टेनिसपटू असलेल्या नोवाक जोकोविकबाबत पत्रक प्रसिद्ध करून यूएसटीएने या कारवाईला दुजोरा दिला आहे. ग्रँडस्लॅमच्या नियमानुसार कुठल्याही खेळाडूने कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा प्रेक्षकाला जखमी केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येते. सामनाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत जोकोविकला दोषी पाहिले आहे.नियमानुसार अमेरिकन ओपनच्या उपउपांत्यफेरीपर्यंत पोहोचण्याबाबत जोकोविकला जी रक्कम मिळणार आहे त्यामधून दंडाची रक्कम कापून घेतली जाईल. तसेच या चुकीसाठी जोकोविकचे रँकिंग पॉईंटसुद्धा घटवण्यात येणार आहेत. नोव्हाक जोकोविक जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आहे. मात्र लाइन्सवुमनवर चेंडू मारल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदासाठी त्याला प्रबळ दावेदार मानण्यात येत होते.उपउपांत्य फेरीच्या या लढतीत जोकोविकला पहिला सेट जिंकण्यात अपयश आले होते. तसेच सर्व्हिस ड्रॉप झाल्याने तो निराश होत होता. तसेच ५-६ या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना नैराश्यामधून त्याने चेंडू मागच्या दिशेने मारला. हा चेंडू थेट जाऊन लाइनवुमन्सला लागला. मात्र यानंतर जोकोविकने सामनाधिकाऱ्यांकडे माफी मागितली. 

या प्रकारानंतर जोकोविकला बाद करण्यात आल्याने स्पेनचे पाब्लो कार्रेनो बुस्टा उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, फेडरर आणि राफेल नडाल यांनी आधीच स्पर्धेतून माघार घेतलेली असल्याने स्पर्धेला नवा विजेता मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिसInternationalआंतरराष्ट्रीय