मेलबर्न : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत कोर्टवर पाऊल ठेवताच सर्वाधिक ४३० ग्रँडस्लॅम सामने खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवला. त्याने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज राॅजर फेडररचा (४२९) विक्रम मोडला.
जोकोविचने दुसऱ्या फेरीत पोर्तुगालचा क्वालिफायर जेमी फरिया याला ६-१, ६-७ (४), ६-३, ६-२ असे पराभूत केले. पुरुष गटात तृतीय मानांकीत कार्लोस अल्काराझने शानदार कामगिरीसह योशिहितो निशिओका याला ६-०, ६-१, ६-४ असे पराभूत केले.
महिला एकेरीत जपानची ओसाका २०२२नंतर पहिल्यांदाच कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या तिसऱ्या फेरीत पोहोचली. तिने कॅरोलिना मुचोव्हा हिच्यावर पिछाडीवरून १-६, ६-१, ६-३ असा विजय मिळवला. दोनवेळची विजेती सबालेंकाने जेसिका बौजास मनेइरो हिला ६-३, ७-५ असे पराभूत करत आगेकूच केली.
युकी-ओलिव्हेटी पराभूतभारताचा युकी भांबरी व त्याचा फ्रान्सचा जोडीदार अल्बानो ओलिव्हेटी हे पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत ट्रिस्टन स्कूलकेट-ॲडम वाल्टन या स्थानिक जोडीकडून सरळ सेटमध्ये पराभूत झाले. युकी-ओलिव्हेटी यांना एक तास २० मिनिटे रंगलेल्या सामन्यात २-६, ६-७ असा पराभव पत्करावा लागला.