शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

आधुनिक टेनिस स्टेडियमचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 02:07 IST

दिग्गज टेनिसपटू केन रोझलवाल यांनी सोमवारी सकाळी सिडनी आॅलिम्पिक पार्कमधील आधुनिक टेनिस स्टेडियमचे औपचारिक उद्घाटन केले. ​​​​​​​

- उदय बिनीवालेसिडनी : चकचकीत झळाळणारा, एटीपी चषक उंचावून दिग्गज टेनिसपटू केन रोझलवाल यांनी सोमवारी सकाळी सिडनी आॅलिम्पिक पार्कमधील आधुनिक टेनिस स्टेडियमचे औपचारिक उद्घाटन केले.पहिली जागतिक सांघिक टेनिस स्पर्धा आॅस्ट्रेलियात ३ ते १२ जानेवारी २०२० दरम्यान खेळली जाणार आहे . सिडनी, पर्थ आणि ब्रिस्बेन येथे २४ देशांच्या खेळाडूंचे गट सामने होतील. त्याच वेळी, उपउपांत्य फेरीपासून अंतिम सामने सिडनी येथे होतील. या पार्श्वभूमीवर सिडनी आॅलिम्पिक पार्क येथील टेनिस स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन करण्यात आले.सुमारे ५०.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करून एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व हवामान आणि वातावरणात सामने पूर्ण व्हावेत आणि टेनिस चाहत्यांना खेळाचा पूर्ण आनंद घेता यावा, या उद्देशाने विशेष प्रकारचे पिटीएफइ फॅब्रिक छत या स्टेडियमवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे आता येथे सामन्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम, विनाअडथळा पार पडतील.आॅस्ट्रेलियाचे महान खेळाडू केन रोझवाल (८ ग्रँडस्लॅम आणि २३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा विजेते) यांच्या हस्ते हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बल्गेरिया टेनिस संघाचा कर्णधार ग्रिगोर दिमित्रोव, बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन, क्रोशियाचा बोर्ना कोरिक आणि ब्रिटनचा जेमी मरे उपस्थित राहिल्याने या सोहळ्यात रंग भरले गेले.या समारंभादरम्यान येथील मंत्री जीओफ ली आणि टेनिस संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते. अत्याधुनिक गुणफलक, आरामदायी खुर्च्या व अन्य सुविधा यामुळे हे जागतिक दर्जाचे टेनिस स्टेडियम लक्षवेधी क्रीडा केंद्र म्हणून ओळखले जाईल .स्पर्धेचे स्वरूप : या स्पर्धेत जेतेपदासाठी २४ देशांचे खेळाडू एकमेकांविरुद्ध भिडतील. एकूण २२ दशलक्ष डॉलर्स रकमेची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत ७५० एकेरी आणि २५० दुहेरी सामने खेळले जातील. सहा गटांमध्ये विभागणी करण्यात आलेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन पद्धतीने सामने खेळविण्यात येतील. प्रत्येक गटातील विजेते आणि सर्वोत्तम २ उपविजेते संघ उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.