शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे यांचा राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शानदार विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 20:58 IST

महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर, आकांक्षा नित्तुरे यांचा राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शानदार विजय

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर आणि आकांक्षा नित्तुरे यांनी सोमवारी नवी दिल्लीतील डीएलटीए कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या २८व्या फेनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ मध्ये आपापल्या पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली. 

महिला एकेरी गटात खेळताना, चौथ्या क्रमांकाची वैष्णवी सुरुवातीपासूनच कोर्टवर सकारात्मक दिसली आणि तिने उत्कृष्ट क्रॉसकोर्ट शॉट्ससह दबदबा राखला. तिने महाराष्ट्राच्या सोनल पाटीलचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राची आकांक्षानेही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट फोरहँड्सचा खेळ करताना  साहिरा सिंगचा ६-२, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला.

दुसरीकडे, पाचव्या क्रमांकाच्या शर्मदा बाळूने (कर्नाटक) तेलंगणाच्या पावनी पाठकचा ६-२, २-४, ६-२  असा पराभव करून  पुढील फेरी गाठली. तामिळनाडूच्या गतविजेत्या मनीष सुरेशकुमारने पुरुष एकेरी गटात मान केशरवानी (उत्तर प्रदेश) वर विजय मिळवला. त्याने हा सामना ६-४, ६-४ असा जिंकला.  राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ श्रेणींसाठी २१.५ लाखाहून अधिक आकर्षक बक्षीस दिली जाणार आहेत.  

टॅग्स :TennisटेनिसMaharashtraमहाराष्ट्र