शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘जोको’ नियमापेक्षा मोठा नाही, प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 23:57 IST

गेल्या आठवड्यात यूएस ओपनमधून तो बाहेर पडला. त्यामुळे त्याची १८ग्रॅण्डस्लॅम मिळवण्याची शक्यता संपली.

-  अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

नोव्हाक जोकोविचसाठी हे वर्ष न विसरण्यासारखे ठरले आहे. त्याने वर्षाच्या मध्ये आॅड्रिया टूरचे आयोजन केले होते. पण कोविड १९ चा प्रसाररोखण्यासाठीच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा फटका त्याला बसला. चारखेळाडूंसह जोकोविच स्वत: पॉझिटिव्ह होता. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोकोविच याने समांतर टेनिसपटूंची संघटना उभी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आले नाही. गेल्या आठवड्यात यूएस ओपनमधून तो बाहेर पडला. त्यामुळे त्याची १८ग्रॅण्डस्लॅम मिळवण्याची शक्यता संपली. नियम मोडल्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली. जोकोविचने निराशेने चेंडू आदळला. नंतर त्याने त्याच्या मागे असलेल्या लाईन जजला धडक दिली. त्यात ती खाली पडली.जोकोने आणखी एक ग्रॅण्डस्लॅम जिंकली असती तर तो राफेल नदाल (१९) आणि रॉजर फेडरर(२०) यांच्या जवळ जाऊ शकला असता. नदाल कोविडच्या भीतीने तर फेडरर दुखापतीतून सावरत असल्याने खेळत नाही. खेळ हा अनिश्चिततेचा आहे. मात्र प्रमुख प्रतिस्पर्धी नसल्याने जोकोविचला विजयाचा मार्ग तसा सोपा होता. पण एका घटनेने तो मागे पडला. त्याची चूक त्याच्या लक्षात येताच लाईन जजची माफीही मागितली तिच्या तब्येतीची चौकशी केली. पण नुकसान झाले होते. काही मिनिटातच हा निर्णय घेण्यात आला होता. जोकोला पराभव मान्य करावा लागला. यूएस. ओपनचे रेफ्री सोरेन फ्रेमेल यांनी कठोर शिक्षा का केलीहे स्पष्ट केले. बॉल चुकीच्या पद्धतीने फेकला. तो सरळ लाईन पंचच्या गळ्याला लागला. आणि तिला दुखापत झाली. त्यामुळे ही कारवाई करावी लागली. त्याच्या विरुद्ध एवढी मोठी कारवाई न्याय्य होती का? एटीपी आणि यूएस ओपनचे अधिकारी हे श्रेयाला पात्र आहेत. कोविड १९ चा खेळाला मोठा फटका बसला आहे. फेडरर आणि नदालच्या अनुपस्थितीत संभाव्य विजेत्या खेळाडूवर अशी कारवाई करणे सोपे नव्हते.- या घटनेमुळे टेनिस विश्व विचलित झाले आहे. पण अनेकांना ही शिक्षा योग्य वाटते. माझा विश्वास आहे ही त्याच्याविरोधातील कारवाई न्याय्य नाही तर आवश्यकही होती. क्रीडा प्रकारातील नियमांना सर्वोपरी मानले जायला हवे, यातून एक चांगला संदेश जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस