शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन वेल्स एटीपीमध्ये प्रजनेशने नोंदवला सनसनाटी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 04:53 IST

जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या निकोलोजला नमविले

इंडियन वेल्स : पात्रता फेरीचा अडथळा पार करीत मुख्य फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या भारताच्या प्रजनेश गुणेश्वरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय नोंदवताना इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या निकोलोज बासिलाशविलीचा पराभव केला. या पातळीवर प्रथमच एकेरीच्या मुख्य फेरीत खेळत असलेल्या डावखुºया प्रजनेशने २ तास ३२ मिनिटांत जॉर्जियाच्या खेळाडूचा ६-४, ६-७, ७-६ ने पराभव केला.जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानी असलेल्या प्रजनेशने पहिल्या सेटच्या पाचव्या गेममध्ये बासिलाशविलीची सर्व्हिस भेदली आणि आपली सर्व्हिस कायम राखत ३१ मिनिटांमध्ये सेट जिंकला. दुसºया व तिसºया सेटममध्ये संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. दोन्ही सेट टायब्रेकपर्यंत लांबले. प्रजनेशने तिसरा व निर्णायक सेट जिंकत आगेकूच केली. प्रजनेश म्हणाला, ‘निश्चितच ही खडतर लढत होती. माझ्या मते मी गेल्या फेरीच्या तुलनेत यावेळी चांगला खेळ केला. मी दिग्गज खेळाडूविरुद्ध खेळत असल्यामुळे चांगला खेळ करावाच लागणार होता. अव्वल २० मधील खेळाडूविरुद्ध सर्वोत्तम खेळ करणे अपेक्षितच होते.’प्रजनेशला आता तिसºया फेरीत जागतिक क्रमवारीत ८९ व्या स्थानावर असलेला खेळाडू इवो कार्लोविचच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने कॅनडाच्या डेनिस शापोवालोव याच्यासह खेळताना स्कॉटलंडच्या जेमी मरे आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस यांना ६-४, ६-४ असे पराभूत करत दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)फ्रेटेनगेलोला नमवत जोकोव्हिच तिसºया फेरीतनोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेचा क्वालिफायर ब्योर्न फ्रेटेनगेलोचा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. जानेवारीमध्ये सातव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर प्रथमच सामना खेळत असलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल जोकोव्हिचने ७-६(७/५), ६-२ ने विजय नोंदवला. त्याला पुढच्या फेरीत जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कोलश्रेबरने निक किर्गियोसचा ६-४, ६-४ ने पराभव केला.क्विटोवाचा पराभव करीत व्हीनस पुढच्या फेरीतसातवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन व्हीनस विलियम्सने एक सेट गमाविल्यानंतर दमदार पुनरागमन करीत तिसºया मानांकित पेत्रा क्विटोवाचा पराभव करुन तिसरी फेरी गाठली. व्हीनसने शनिवारी क्विटोव्हाविरुद्ध ४-६, ७-५, ६-४ ने सरशी साधली. व्हीनसला तिसºया फेरीत मायदेशातील सहकारी क्रिस्टीना मॅकहेलच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मॅकहेलने रशियाच्या ३० व्या मानांकित अनास्तासिया पावलुचेनकोव्हाचा ६-४, ३-६, ६-४ ने पराभव केला.

टॅग्स :Tennisटेनिस