शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

फ्रेंच ओपन : व्हिनस पहिल्याच फेरीत गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:27 AM

अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले.

पॅरिस - अमेरीकेची स्टार टेनिस खेळाडू व्हिनस विल्यम्स हिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक रँकिंगमध्ये ९१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनची खेळाडू कियांग वँग हिने ६-४,७-५ असे पराभूत केले.सात वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती व्हिनस मागच्या सहा फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये खेळताना तिला तिसऱ्यांदा पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही. क्ले कोर्टवर आपली २१ वी स्पर्धा खेळणाºया व्हिनसवर चीनच्या वँग हीने १०० मिनीटे चाललेल्या सामन्यात वर्चस्व गाजवले. सुमारे वर्षभरापुर्वी व्हिनस विल्यम्स हिला असाच पराभव पत्करावा लागला होता. तसेच तिला या वर्षी झालेल्या आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत देखील पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. चौथे मानांकनप्राप्त बुल्गारियाचा ग्रिगोर दिमित्रोव्हने मिस्रचा ‘लकी लुजर’ मोहम्मद सफवतचा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दिमित्रोव्हने या एकतर्फी सामन्यात ६-१, ६-४, ७-६ ने सरशी साधली. पॅरिसमध्ये यापूर्वी कधीच तिसºया फेरीच्या पुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेल्या दिमित्रोव्हला पहिल्या फेरीत अनुभवीव्हिक्टर ट्राईकीविरुद्ध खेळायचे होते, पण कोर्टवर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी ट्राईकीनेपाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जागतिक क्रमवारीत १८२ व्या स्थानावर असलेल्या सफवतला ग्रॅण्डस्लॅम पदार्पणाची संधी मिळाली. सफवत १९९६ मध्ये अमेरिकन ओपनममध्ये तामेर अल सावीनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुख्य फेरीत खेळणारा मिस्रचा पहिला टेनिसपटू ठरला. दिमित्रोव्हला अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळवण्यासाठी अमेरिकेचा जयर्ड डोनाल्डसन व चिलीचा निकोलस जेरी यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.गतविजेती ओस्टापेनको पहिल्या फेरीत पराभूतगतविजेती येलेना ओस्टापेनको हिला पहिल्याच फेरीतपराभव पत्करावा लागला. युक्रेनच्या कॅथरीना कोज्लोवा हीने गतविजेत्या ओस्टापेनको हिचे आव्हान ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये संपवले. रविवारी १ तास पाच मिनिटे झालेल्या या सामन्यात ६६ वेरँकिंग असलेल्याकॅथरीना हिने पहिल्या सेटमध्ये संघर्ष करत तर दुसºया सेटमध्ये ३-२ अशा पिछाडीवरून कोज्लोवा हिने६-३ असा विजय मिळवला.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या