...अखेर चीनविरुद्ध पेसला न्याय मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:30 AM2018-03-11T01:30:05+5:302018-03-11T01:30:05+5:30

अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते.

 Finally, the possibility of getting justice for Paes against China | ...अखेर चीनविरुद्ध पेसला न्याय मिळण्याची शक्यता

...अखेर चीनविरुद्ध पेसला न्याय मिळण्याची शक्यता

googlenewsNext

नवी दिल्ली - अनुभवी लिएंडर पेसचे चीनविरुद्ध पुढील महिन्यात होणाºया डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते. त्याची घोषणा निवड समिती उद्या करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उझबेकिस्तानविरुद्ध सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. तो बंगळुरू येथील वादानंतर संघात नव्हता. तेव्हा त्याला कर्णधार भूपतीने सुरुवातीला संघात स्थान दिले नव्हते. तथापि, एआयटीएच्या पदाधिका-यांनुसार पेस संघात असणे एशिया-ओशियाना ग्रुप एक लढतीत भारतासाठी लाभदायक ठरेल.
एआयटीएच्या सूत्रांनुसार, ‘‘आम्ही कॅनडाविरुद्ध दुहेरी सामना गमवायला नको होता. जर आम्ही तो जिंकला असता तर आम्ही विश्व ग्रुपमध्ये स्थान बनवू शकलो असतो. अनुभवाबाबत पेसचे संघात बरेच योगदान असते.’’ कर्णधार भूपती आणि दुहेरी तज्ज्ञ रोहन बोपन्ना यांच्यासोबत पेसचे संबंध चांगले नाहीत, याविषयी छेडले असता पदाधिका-याने म्हटले, ‘‘हा वैयक्तिक लोकांचा नाही तर संघ आणि देशाचा विषय आहे. उद्या निवड समितीची बैठक होणार असून, निश्चितच पेसच्या नावावर विचार होणार आहे. तो डेव्हिस चषक विश्वविक्रमापासून फक्त एका विजयाने दूर आहे. त्याने देशासाठी खेळताना खूप योगदान दिले आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.’’ पेसची निवड झाल्यास पूरव राजाला स्थान मिळणार नाही.
जर पेस दुहेरीचा सामना जिंकल्यास त्याचा डेव्हिस चषकातील ४३ व्या दुहेरीतील विजय ठरेल आणि तो इटलीच्या निकोला पिट्रांगेली याला मागे टाकेल. पेसने दुबई एटीपी स्पर्धेत सुरेख कामगिरी केली. या बळावर त्याने अव्वल ५० जणांत पुनरागमन केले आहे आणि तो ४४ व्या स्थानावर आला आहे. बोपन्ना (२०) याच्यानंतर दिविज शरण (४४) हे भारताचे दुहेरीतील सर्वोच्च रँकिंगमधील खेळाडू आहेत आणि त्यांचे संघात पुनरागमन होण्याची  शक्यता आहे. एकेरीत युकी भांबरी, रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांची निवड जवळपास निश्चित आहे.

Web Title:  Finally, the possibility of getting justice for Paes against China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.