फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:41 AM2019-01-17T06:41:46+5:302019-01-17T06:42:08+5:30

ऑस्ट्रेलियन ओपन; शारापोवा, कर्बर यांनी मिळवला एकतर्फी विजय

Federer, Nadal's expected advance | फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच

फेडरर, नदाल यांची अपेक्षित आगेकूच

Next


मेलबर्न : गतविजेता रॉजर फेडरर, राफेल नदाल या दिग्गजांनी आपापल्या सामन्यांत बाजी मारताना    ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विजयी आगेकूच केली. महिलांमध्ये द्वितीय मानांकित अँजोलिका कर्बर, मारिया शारापोवा आणि कॅरोलिन वोज्नियाकी यांनीही आपापल्या लढती जिंकून आगेकूच केली.


विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या फेडररने सलग तीन सेटमध्ये बाजी मारली असली, तरी त्याला विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. ब्रिटनच्या डॅनियल इवान्सने याने अनुभवी फेडररला २ तास ३५ मिनिटांपर्यंत झुंजविले. पहिले दोन सेट टायब्रेकमध्ये जिंकल्यानंतर फेडररने इवान्सला आपला हिसका दाखविला आणि सामना ७-६(७-५), ७-६(७-३), ६-३ असा जिंकला. जर मी सुरुवातीपासून दबाव निर्माण केला असता, तर नक्कीच ही लढत लवकर संपली असती,’ अशी प्रतिक्रिया फेडररने या वेळी दिली.
दुसरीकडे, राफेल नदालने १८व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाकडे वाटचाल करताना  ऑस्ट्रेलियच्या मॅथ्यू एबडेन याचा ६-३, ६-२, ६-२ असा सहज पराभव केला. ‘ही लढत आव्हानात्मक झाली. एकतर्फी झालेल्या या लढतीत नदालने १ तास ५६ मिनिटांमध्ये बाजी मारली. विशेष म्हणजे या स्पर्धेत जेतेपद पटकावल्यास नदाल ओपन युगामध्ये राय एमरसन आणि रॉड लावेर यांच्यानंतर प्रत्येक ग्रँडस्लॅम किमान दोनवेळा जिंकणारा तिसरा टेनिसपटू ठरेल.


पाचव्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यानेही विजयी आगेकूच करताना अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो याचा ४-६, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर अँडरसनने जबरदस्त पुनरागमन केले. तसेच सहाव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिच याने अमेरिकेच्या मॅकेंजी डोनाल्ड याचे कडवे आव्हान पाच सेटमध्ये संपुष्टात आणले. ३ तास ३७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात अनुभवी सिलिच याने ७-५, ६-७, ६-४, ६-४ असा झुंजार विजय मिळवताना विजयी आगेकूच केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Federer, Nadal's expected advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.