माद्रिद : राफेल नदालने फेलिसियानो लोपेज याच्या साथीने निर्णायक दुहेरीच्या सामन्यात विजय मिळवत उपांत्य फेरीत ब्रिटनचा २-१ ने पराभव केला. या शानदार विजयासह नदालने स्पेनला डेव्हिस चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले. स्पेन २०१२ नंतर अंतिम फेरीत पोहचला असून जेतेपदासाठी आता त्यांना कॅनडाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.शनिवारी झालेल्या एकेरीच्या सामन्यात लोपेजला काईल एडमंडकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र नदालने इवान्सला पराभूत करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात नदाल- लोपेज जोडीने जेमी मरे व नीतल स्कुपस्की यांच्यावर ७-६, ७-६ असा झुंजार विजय मिळवला.पाचवेळचा विजेता स्पेन २०१२ सालानंतर पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहचला आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पेनचा सामना कॅनडाशी होईल. कॅनडाने दुसºया उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. डेनिस शापोलोव व वासेक पोसपिसिल यांच्या खेळाच्या जोरावर कॅनडा अंतिम फेरीत पोहचला. त्याचवेळी. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालला आपल्या पाचव्या डेव्हिस चषक विजेतेपदाची उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)
डेव्हिस चषक टेनिस : नदालच्या जोरावर स्पेन अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 05:08 IST