शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

डेव्हिस कप : टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या आक्षेपावर एआयटीएने केले दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 1:29 AM

एआयटीएने निवड प्रक्रियेपासून खेळाडूंना दूर ठेवण्याचा कडवा इशारा देताना रोहन बोपन्नाच्या आक्षेपानंतरही रविवारी लिएंडर पेसचा डेव्हिस कप संघात समावेश केला.

नवी दिल्ली - एआयटीएने निवड प्रक्रियेपासून खेळाडूंना दूर ठेवण्याचा कडवा इशारा देताना रोहन बोपन्नाच्या आक्षेपानंतरही रविवारी लिएंडर पेसचा डेव्हिस कप संघात समावेश केला.पाच सदस्यांच्या निवड समितीने युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, सुमित नागल, बोपन्ना व पेस यांच्याव्यतिरिक्त संघामध्ये राखीव सदस्य म्हणून दिवीज शरण यांचा समावेश केला. अपेक्षेप्रमाणे पूरव राजाला संघातून वगळण्यात आले. कारण कॅनडाविरुद्ध विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीत त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती.एआयटीच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार नॉन प्लेर्इंग कर्णधार महेश भूपतीने निवड समितीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात सिनिअर व्यावसायिक खेळाडू बोपन्ना पेसला आपला डेव्हिस कप विश्वविक्रम नोंदवण्याची संधी मिळावी यासाठी चीनविरुद्धच्या लढतीसाठी संघाबाहेर राहू इच्छितो. या लढतीत पेससोबत जोडी बनविण्यास इच्छुक नसल्याचा संदेश बोपन्ना देऊ इच्छित होता.’निवड समितीने मात्र बोपन्ना व पेस या दोघांनाही संघात स्थान दिले. त्यामुळे तेनजिनमध्ये ६-७ एप्रिलला होणाºया लढतीत खेळायचे किंवा नाही याचा निर्णय आता बोपन्नाला घ्यायचा आहे.एआयटीएचा अधिकारीने सांगितले की, ‘शनिवारी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली होती. कर्णधाराच्या मते रोहन बोपन्ना व लिएंडर पेस यांच्यादरम्यान कोर्टवर ताळमेळ नाही. केवळ लिएंडरच बोपन्नाला त्याच्या साथीने खेळविण्यास तयार करू शकतो, असे कर्णधाराला वाटते. त्यासाठी पेसने बोपन्नासोबत चर्चा करायला हवी.’एआयटीएचे अधिकारी पुढे म्हणाले की, ‘रोहन बोपन्नाचा निर्णय यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बोपन्नाला अद्याप सरकारी अनुदान मिळते आणि याचा त्याने विचार करायला हवा. वैयक्तिक मतभेद विसरून देशासाठी खेळण्यास नकार देणाºया खेळाडूंचे एआयटीए कधीच समर्थन करणार नाही. त्याला भारतातर्फे वर्षातून दोनदा किंवा तिनदा खेळावे लागू शकते. त्यामुळे केवळ दोन आठवडे वैयक्तिक मतभेद विसरता येणार नाही.’ याआधीएप्रिल २०१७ मध्ये उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीतूनही लिएंडर पेसला वगळण्यात आले होते. (वृत्तसंस्था)बोपन्ना व पेस यांच्यादरम्यान वादाला २०१२ पासून सुरुवात झाली. त्यावेळी लंडन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी हे दोघे एटीपी टूरमध्ये एकत्र खेळण्याची आशा होती, पण त्यानंतर बोपन्नाने पेससोबत जोडी बनविण्यास नकार दिला आणि एआयटीएला भूपतीसोबत त्याची जोडी बनवावी लागली.पेसला पुरुष दुहेरी स्पर्धेत विष्णू वर्धनच्या साथीने खेळावे लागले. मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झाच्या साथीने त्याची जोडी बनविण्यात आली होती. सानियाने त्यावेळी निराशा व्यक्त करताना एआयटीएने पेसला शांत करण्यासाठी माझा प्यादा म्हणून वापर केल्याचे म्हटले होते.पेस म्हणाला,‘भारतीय संघात पुनरागमन केल्यामुळे खूश आहे. मी कसून मेहनत घेतली असून आपल्या क्रमावारीत सुधारणा केली. मी रोहनसोबत खेळण्यास तयार आहे. आम्ही एक चांगली जोडी बनू शकतो. खेळाडू म्हणून मी रोहनचा आदर करतो.’ बेंगळुरुतील नाट्यानंतर पेस संघाबाहेर होता. कर्णधार महेश भूपतीने सहा सदस्यांच्या संघात त्याचा समावेश असल्यानंतरही त्याला सुरुवातीच्या संघात स्थान दिले नाही. पेस अमेरिकेहून बेंगळुरुमध्ये दाखल झाला होता.पेसची क्रमवारीत प्रगतीपेसने दुबई एटीपी ५०० स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत मानांकनामध्ये अव्वल ५० मध्ये पुनरागमन केले. तो सध्या ४६ व्या स्थानी आहे. तो या स्पर्धेत जेमी सेराटानीच्या साथीने उपविजेता ठरला.शरण मानांकनामध्ये ४४ व्या स्थानी आहे. बोपन्नानंतर (२० वे स्थान) तो दुसरा उच्च मानांकन असलेला खेळाडू आहे. २०१२ नंतर तो संघात परतला आहे.

टॅग्स :Leander Paesलिएंडर पेसSportsक्रीडा