चायना ओपन आजपासून : सायना, प्रणॉय चमकदार कामगिरीसाठी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:43 AM2017-11-14T00:43:37+5:302017-11-14T00:44:18+5:30

राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेत जेतेपद पटकावत दुबई सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्रता मिळवण्यास उत्सुक आहेत.

 China Open today: Saina, the prannoy eager for the brilliant performance | चायना ओपन आजपासून : सायना, प्रणॉय चमकदार कामगिरीसाठी उत्सुक

चायना ओपन आजपासून : सायना, प्रणॉय चमकदार कामगिरीसाठी उत्सुक

Next

फुजोऊ : राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेत जेतेपद पटकावत दुबई सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्रता मिळवण्यास उत्सुक आहेत.
जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू सायनाने आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूचा पराभव करीत गेल्या आठवड्यात तिसºयांदा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. प्रणॉयने किदाम्बी श्रीकांतचा पराभव करीत प्रथमच राष्ट्रीय विजेतेपद पटकावले.
सायना व प्रणॉय हे दोन्ही खेळाडू डेस्टिनेशन दुबई रँकिंगमध्ये ११ व्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे पात्रता मिळवण्यासाठी केवळ दोन स्पर्धा चायना ओपन व हाँगकाँग ओपन शिल्लक आहेत. ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावणाºया सायनाला सलामी लढतीत अमेरिकेच्या बेवेन झांगच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर प्रणॉय पहिल्या फेरीत क्वालिफायरसोबत खेळणार आहे.
पुरुष विभागात बी. साई प्रणितची सलामीला डेन्मार्कच्या एंडर्स एंटोंसेनविरुद्ध गाठ पडणार आहे, तर अजय जयराम जपानच्या काजुमासा सकाईसोबत खेळेल. फिटनेसच्या कारणास्तव गेल्या दोन सुपर सिरीज स्पर्धेतून माघार घेणारा सौरभ व समीर वर्मा पुनरागमन करणार आहेत. सौरभची लढत फ्रान्सच्या ब्राईस लीव्हरदेजसोबत होईल तर समीर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला व गत चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनविरुद्ध खेळेल. दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी यांची गाठ पाचवे मानांकनप्राप्त चीनच्या हुआंग याकियोंग व झेंग सिव्हेई यांच्यासोबत पडणार आहे. राष्ट्रीय चॅम्पियन अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी महिला दुहेरीमध्ये कोरियाच्या हा ना बायक व चाए यू जुंग यांच्याविरुद्ध खेळतील. पुरुष एकेरीमध्ये राष्टकुल चॅम्पियन पारुपल्ली कश्यपची गाठ पात्रता फेरीत चीनच्या गुओ केईविरुद्ध पडणार आहे. (वृत्तसंस्था)
यंदाच्या मोसमात पाच स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारताना चार स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणाºया श्रीकांतने स्नायूच्या दुखापतीमुळे चायना ओपनमधून माघार घेतली आहे.
इंडिया ओपन व कोरिया ओपन या स्पर्धांव्यतिरिक्त विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावणारी सिंधू राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. सिंधूला पहिल्या फेरीत जपानाच्या सायाका सातोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
सातोने यंदा इंडोनेशिया ओपनमध्ये जेतेपद पटकावले आहे. पहिल्या दोन फेरीचा अडथळा दूर केला तर तिसºया फेरीत सिंधूची गाठ जपानच्या नोजोमी ओकुहारासोबत पडू शकते. ओकुहाराने ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत सिंधूचा पराभव केला होता.

Web Title:  China Open today: Saina, the prannoy eager for the brilliant performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.