शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, राफेल नदाल उपांत्य फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:12 IST

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला विभागात पेत्रा क्विटोवा अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.

मेलबोर्न : राफेल नदालने चमकदार कामगिरी कायम राखताना काही आघाडीच्या खेळाडूंना गाशा गुंडाळण्यास भाग पाडणाऱ्या फ्रांसेस टिफोऊचा मंगळवारी सहज पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला विभागात पेत्रा क्विटोवा अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.नदालने टिफोऊचा केवळ १०७ मिनिटांमध्ये ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. बिगरमानांकित टिफोऊने उपांत्यपूर्व फेरी गाठताना पाचव्या मानांकित केव्हिन अँडरसन व २० व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह यांचा पराभव केला होता. युनानच्या या १४व्या मानांकित खेळाडूने चौथ्या फेरीत गतचॅम्पियन रॉजर फेडररचा पराभव केला होता. २० वर्षीय स्टीपासने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या २२व्या मानांकित रॉबर्टो बातिस्ता आगुटचा ७-५, ४-६, ६-४, ७-६(२) ने पराभव केला.महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने उपांत्य फेरी गाठली. तिने उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाच्या १५ व्या मानांकित अ‍ॅशलीग बार्टीचा ६-१, ६-४ ने पराभव केला. क्विटोव्हाला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेनिली रोज कोलिन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. या बिगरमानांकित खेळाडूने रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोव्हाची झुंज २-६, ७-५, ६-१ ने मोडून काढली.१८ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेल्या नदालचे लक्ष सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रत्येकी दोनदा विजेतेपद मिळवणारा चौथा खेळाडू ठरण्यावर केंद्रित झाले आहे. ओपन युगात एकाही खेळाडूला हा पराक्रम करता आलेला नाही.आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये यापूर्वी २००९ मध्ये एकमेव विजेतेपद पटकावणारा नदाल म्हणाला, ‘या स्पर्धेत मला माझ्या पूर्ण कारकीर्दीत काही अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आजच्या कामगिरीमुळे मी खूश आहे.’>लिएंडर पेस - स्टोसूर जोडी ‘आऊट’मेलबोर्न : अनुभवी लिएंडर पेस व त्याची सहकारी समांथा स्टोसूर यांना आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसºया फेरीत मंगळवारी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.मिश्र दुहेरीत पेस-स्टोसूर या बिगरमानांकित जोडीने कोलंबियाच्या रोबर्ट फराह व जर्मनीच्या एना-लेना ग्रोनफोल्ड या जोडीविरुद्ध पहिला सेट ६-४ ने जिंकल्यानंतर दुसरा सेट या फरकाने गमावला. तिसरा सेट टायब्रेकपर्यंत लांबला. त्यात भारत-आॅस्ट्रेलिया जोडीला ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला.च्पेस-स्टोसूर जोडीने पहिल्या फेरीत नेदरलँडच्या वेस्ले कोलहोफ व चेक प्रजासत्ताकच्या कवेटा पेश्के जोडीचा सरळ सेट््समध्ये ६-४, ७-५ ने पराभव केला होता.च्या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आले होते.