शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:42 IST

सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली.

मेलबोर्न - सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली. त्यानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे सुरुवातीला वनातील आगीमुळे चर्चेत राहिलेल्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये पहिल्या दिवशी अनेक सामने होऊ शकले नाही.धुरामुळे गेल्या आठवड्यात पात्रता स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूला  खोकला व श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनास उशिर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्पर्धा आपल्या निर्धारित कार्यक्रमानुसार सुरू झाली कारण येथील हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे स्पष्ट झाले, पण चार तासानंतर मुसळधार पावसामुळे बाहेरच्या कोर्टवरील सामने थांबवावे लागले.जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडरर रॉड लेव्हरमध्ये छत बंद करताना कोर्टबाहेर होता. त्याने परत आल्यानंतर अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला. २० वर्षांपूर्वी येथे पदार्पण केल्यानंतर फेडरर अद्याप कधीच पहिल्याच फेरीत पराभूत झालेले नाही. मारग्रेट कोर्ट एरेना व मेलबोर्न एरेनामध्येही बंद छताखाली खेळ झाला. मंगळवारीही येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे ६४ पैकी ४८ सामने मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.

२४ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील असलेल्या सेरेना विलियम्सने दमदार सुरुवात केली तर गतविजेत्या नाओमी ओसाकाने सहज विजयाची नोंद करीत दुसºया फेरीत स्थान मिळवले. सेरेनाने रशियाच्या एनस्तासिया पाटोपोव्हाविरुद्ध पहिला सेट १९ मिनिटांमध्ये जिंकला आणि त्यानंतर केवळ ५८ मिनिटांमध्ये ६-०, ६-३ असा विजय साकारला. सेरेनाची मोठी बहिण व्हीनस विलियम्सला मात्र, अमेरिकेच्याच १५ वर्षीय कोको गॉफने ७-६(७-५), ६-३ असे पराभूत करीत गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.ओसाकाने चेक प्रजासत्ताकच्या मॅरी बोजकोव्हाचा ८० मिनिटांमध्ये ६-२, ६-४ ने पराभव केला. निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी आपल्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत असलेली कारोलिन वोजनियाकीनेही सहज विजय नोंदवत दुसरी फेरी गाठली. डेन्मार्कच्या या बिगरमानांकितखेळाडूने अमेरिकेच्या क्रिस्टी एनचा ६-१, ६-३ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)सॅम क्वेरीची सहज आगेकूचपुरुष विभागात कॅनडाचा युवा स्टार १३ वे मानांकन प्राप्त डेनिस शापोवालोव्हला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने ६-३, ६-७ (७/९), ६-१, ७-६(७/३) असे नमविले. इटलीच्या आठव्या मानांकित माटियो बेरेटिनी व अर्जेंटिनाचा २२ वा मानांकित गुइडो पेला यांनी दुसरी फेरी गाठली.बेरेटिनीने आॅस्ट्रेलियाच्या अँड्य्रू हॅरिसचा ६-३, ६-१, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीने कोरिचला ६-३, ६-४, ६-४ असे नमविले.महिलांमध्ये अमेरिकेची १४ व्या मानांकीत सोफिया केनिनने इटलीच्या मार्टिना ट्रेविसानचा ६-२, ६-४ असा, तर क्रोएशियाच्या १३ व्या मानांकित पेट्रा मार्टिचने अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहालेचा ६-३, ६-० असा पराभव केला.

पुरुष विभागात कॅनडाचा युवा स्टार १३ वे मानांकन प्राप्त डेनिस शापोवालोव्हला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने ६-३, ६-७ (७/९), ६-१, ७-६(७/३) असे नमविले. इटलीच्या आठव्या मानांकित माटियो बेरेटिनी व अर्जेंटिनाचा २२ वा मानांकित गुइडो पेला यांनी दुसरी फेरी गाठली.बेरेटिनीने आॅस्ट्रेलियाच्या अँड्य्रू हॅरिसचा ६-३, ६-१, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीने कोरिचला ६-३, ६-४, ६-४ असे नमविले.महिलांमध्ये अमेरिकेची १४ व्या मानांकीत सोफिया केनिनने इटलीच्या मार्टिना ट्रेविसानचा ६-२, ६-४ असा, तर क्रोएशियाच्या १३ व्या मानांकित पेट्रा मार्टिचने अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहालेचा ६-३, ६-० असा पराभव केला. 

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिसserena williamsसेरेना विल्यम्स