शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

ऑस्ट्रेलियन ओपन : राफेल नदाल दुसऱ्या फेरीत; मारिया शारापोव्हा पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 04:51 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला.

मेलबोर्न - जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू राफेल नदालने एकतर्फी लढतीत बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. दरम्यान, पाचवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन रशियाची स्टार खेळाडू मारिया शारापोव्हा पराभूत झाली.नदालने सलामीच्या लढतीत ६-२, ६-३, ६-० असा सहज विजय मिळवला. तीन वेगवेगळ्या दशकांत जागतिक क्रमवारील अव्वल स्थान भूषविणाºया नदालची नजर २० व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर आहे. त्याचसोबत तो ओपन युगात किमान दोनवेळा सर्व चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरण्याच्या प्रयत्नात आहे. या विजयानंतर नदाल म्हणाला, ‘ही सकारात्मक सुरुवात आहे. पहिल्या फेरीत सरळ सेट््समध्ये विजय नोंदविणे चांगले आहे.’ आता नदालची लढत अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस किंवा पोर्तुगालच्या जोओ साऊसा यांच्यापैकी एकासोबत होईल. फेडरर आणि गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिच यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.दुसरीकडे शारापोव्हाला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू शारापोव्हाला क्रोएशियाच्या १९ व्या मानांकित डोन्ना वेकिचविरुद्ध ६-३, ६-४ असा पराभव स्वीकारावा लागला. २००८ ची चॅम्पियन असलेल्या शारापोव्हाला विशेष प्रवेशिकेद्वारे स्पर्धेत स्थान मिळाले होते. बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी झालेल्या निलंबनाच्या शिक्षेनंतर कोर्टवर परतलेल्या शारापोव्हाला फॉर्म व फिटनेससाठी संघर्ष करावा लागत आहे. गेल्या वर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे ती अनेकस्पर्धांना मुकली. ती सलग तीन ग्रँडस्लॅममध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाली.अन्य लढतीत ब्रिटनची जोहाना कोंटाला पहिल्या फेरीत ट्युनेशियाच्या बिगरमानांकित ओंस जाबेऊरने ६-४, ६-२ असे सरळ तीन सेटमध्ये सहजपणे पराभूत केले. तसेच, इटलीच्या १८ वर्षीय जानिक सिनेरनेही दमदार विजय मिळवताना आॅस्ट्रेलियाच्या मॅक्स परसेलचा ७-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)प्रजनेश पहिल्याच फेरीत गारदभारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनला पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्याने जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध खेळण्याची संधी गमावली.जागतिक क्रमवारीत १२२ व्या स्थानी असलेला प्रजनेश पात्रता फेरीतून ‘लकी लुजर’ म्हणून मुख्य फेरीत दाखल झाला. त्याला पहिल्या फेरीत जपानच्या तत्सुमा इतोविरुद्ध २ तास रंगलेल्या लढतीत ४-६, २-६, ५-७ असा पराभव पत्करावा लागला. इतोला आता सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.प्रजनेश म्हणाला, ‘इतोला नमवता आले असते. माझ्यासाठी हा चांगला ड्रॉ होता. मी याआधी तीन सामने आणखी खेळलो होतो. माझी तयारी चांगली होती, पण दडपण झुगारता आले नाही. शांतचित्ताने खेळता न आल्याचा परिणाम माझ्या खेळावर झाला. त्याने चांगला खेळ केला व विजयासाठी आवश्यक असलेले सर्वकाही त्याने केले.’

टॅग्स :TennisटेनिसAustralian Openऑस्ट्रेलियन ओपनRafael Nadalराफेल नदाल