शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन : नंबर 1 सिमोना हालेपचा विजयासाठी पावणेचार तास संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 19:22 IST

जगातील नंबर वन टेनिसपटू रूमानियाची सिमोना हालेप हिला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खऱ्या  अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला.

मेलबोर्न : जगातील नंबर वन टेनिसपटू रूमानियाची सिमोना हालेप हिला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खऱ्या  अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने तिला विजयासाठी तब्बल पावणेचार तास झुंजायला भाग पाडले. यादरम्यान सिमोना एक दोन वेळा नाही तर तीन वेळा अक्षरश: हरता हरता वाचली. तब्बल तीन मॅचपॉर्इंट वाचवत सिमोनाने हा मॅरेथॉन सामना ४-६, ६-४, १५-१३ असा जिंकला आणि चौथी फेरी गाठली. १९९६ नंतरचा ऑस्ट्रेलियन ओपनमधला हा सर्वाधिक गेम खेळला गेलेला सामना ठरला. १९९६ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या चंदा रूबीनने स्पेनच्या अरांता सांचेझ व्हिकारिओवर ६-४, २-६, १६-१४ असा विजय मिळवला होता. नेमके तेवढेच ४८ गेम शनिवारच्या सामन्यातही खेळले गेले. या सामन्यातील शेवटचा एकच सेट तब्बल दोन तास २२ मिनीटे चालला. या अक्षरश: दमछाक करणाऱ्या विजयानंतर सिमोना म्हणाली की, एवढा प्रदीर्घ तिसरा सेट मी कधीच खेळले नव्हते. मी प्रचंड थकली होती. माझे पायाचे घोटे आणि स्रायू अक्षरश: बधीर झाले होते.या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये तीन वेळा हालेपला मॅच पॉर्इंट होता परंतु प्रत्येक वेळी डेव्हिसने तिला विजयापासून वंचित ठेवले. तिसऱ्या सेटमध्ये ५-४, ६-५ आणि ८-७ असा स्कोअर असताना हालेपला हे मॅचपॉर्इंट मिळाले होते. या थकविणाऱ्या विजयानंतर हालेपचा चौथ्या फेरीचा सामना आता जपानच्या नाओमी ओसाकाशी होईल.