शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन: चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 19:58 IST

मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाऱ्या  टीकेत शनिवारी जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवच्या संतापाची भर पडली. 

मेलबोर्न : यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन खेळाबरोबरच ढिसाळ आयोजन आणि सुमार पंचगिरीने गाजत आहे. मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाऱ्या  टीकेत शनिवारी जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवच्या संतापाची भर पडली. हा चौथा मानांकित खेळाडू आपल्या तिसऱ्या  फेरीच्या सामन्यादरम्यान ‘अहो, दिवे लावा हो..चेंडू व्यवस्थित दिसत नाही’ अशी तक्रार करत राहिला परंतु त्याचा पराभव जवळपास निश्चित झाल्यावरच पंच आणि आयोजकांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली.आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून झ्वेरेवने सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये अक्षरश: सामना सोडून दिल्यासारखा खेळ केला. दक्षिण कोरियाच्या हियॉन चुंगविरुद्धचा हा सामना त्याने तीन तास २२ मिनिटात ७-५, ६-७ (३-७), ६-२, ३-६, ०-६ असा गमावला. या सामन्यातील अखेरच्या सेटमध्ये झ्वेरेवने फक्त पाचच गुण घेतले आणि चुंगच्या एका चुकीच्या तुलनेत तब्बल १४ वेळा चुकीचे फटके लगावले. हे त्याने शेवटी सामना सोडून दिल्याचेच लक्षण होते. सामन्याच्या चौथ्या सेटपासून अंधारामुळे चेंडू व्यवस्थित दिसत नसल्याची झ्वेरेवची तक्रार सुरू झाली. या सेटमध्ये १-४ असा पिछाडीवर पडल्यावर तर तो भडकलाच  आणि पंचांवर ‘दिवे सुरू करा हो..!’ असे ओरडला. तुम्हाला तिकडे अंधार आहे हे दिसत नाही का, अशी विचारणाही त्याने पंचांना केली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की मी सलग सहा गेमपर्यंत पंचांना अंधार असल्याने चेंडू दिसत नसल्याचे आणि दिवे लावण्यासाठी सांगत होतो परंतु पाच गेम होऊनही त्यांनी दिवे लावले नव्हते. झ्वेरेवबद्दल एक लक्षवेधी आकडेवारी समोर आली आहे ती अशी की...त्याने एटीपीच्या इतर सहा स्पर्धा जिंकल्या असल्या तरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तो एकदाही उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे गेलेला नाही. हॉक आय बंदचा गास्केटला फटकानीक किरग्योसच्या सामन्यात पंचांकडील माईक सिस्टीम बंद पडल्याची घटना ताजी असताना आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी रॉजर फेडरर आणि रिचर्ड गास्केट यांच्या सामन्यादरम्यान नाजूक गुणांचे निर्णय घेण्यासाठीची हॉक आय रिप्ले सिस्टिम बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या  सेटमध्ये ३-३ आणि ३०-३० अशी सर्व्हिस असताना फेडररच्या सर्व्हिसवर आज गास्केटला एका संभाव्य ब्रेकपॉर्इंटपासून वंचित रहावे लागले. फेडररची एस आऊट अशी जाहीर झाल्यावंर पंचांनी तो फटका योग्य असल्याचा निर्णय दिला होता परंतु गास्केटच्या मते ती वाईड होती परंतु हॉक आय सिस्टिम बंद असल्याने याचा अचूक निर्णय होऊ शकला नाही. बर्डिचलाही पंच नडलेपंचगिरीची समस्या थॉमस बर्डिच आणि युआन मार्टीन डेल पोट्रोच्या सामन्यातही राहिली.त्यात लाईनमनने डेल पोट्रोचा एक आऊट ठरवलेला फटका मुख्य पंचांनी योग्य ठरवला. यामुळे बर्डिचने गुण गमावला. या निर्णयावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त करत पंचांविरुद्ध आयोजकांकडे तक्रार केली आहे.