मेलबर्न : माजी विजेती नाओमी ओसाकाने चीनच्या झेंग सेइसेइला ६-२,६-४ असे पराभूत करत आॅस्टेÑलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्सनेही आपले सामने जिंकून पुढील फेरी गाठली.अमेरिकेच्या अनुभवी कोको गॉफने आपली विजयी कूच कायम राखताना अनुभवी सोराना क्रिस्टीला ४-६, ६-३, ७-५ असे पराभूत केले. सेरेनानेही सहज विजयासह आगेकूच करताना जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानावरील स्लोवेनियाच्या तमारा जिदानसेकचा ६-२, ६-३ असा पराभव केला. पेत्रा क्वितोव्हाने पाउला बाडोसाला ७-५, ७-५ असे पराभूत केले. कॅरोलिन वोजनियाकी व अश्ले बार्टी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत पुढील फेरी गाठली.जोकोविचने जपानच्या तत्सुमा इतोचा ६-१, ६-४, ६-२ असा पराभव केला. स्टेफोनोस सिटसिपासला फिलीप कोहलस्त्रायबरकडून पुढे चाल मिळाली. त्याचवेळी मारिन सिलिचने फ्रान्सच्या बेनाइट पियरेला ५ सेटमध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)दिविजची विजयी सलामीभारताच्या दिविज शरणने न्यूझीलंडच्या अर्टेम सिटाकसह खेळताना पुरुष दुहेरीत पोर्तुगालच्या पाब्लो कारेनो बस्टा आणि स्पेनच्या जोओ सोउसा यांचा ६-४, ७-५ असा पराभव केला. त्याचवेळी भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि जपानच्या यासुताका उचियामा यांना अमेरिकेच्या बॉब आणि माईक या ब्रायन बंधूंकडून १-६, ६-३, ६-३ असा पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, सेरेना यांचा पुढील फेरीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 03:51 IST