शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर तिस-या फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 2:37 AM

सहा वेळा चॅम्पियन नोवाक जोकोविच, डॉमिनिक थिएम, मारिया शारापोवा, १९ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत

मेलबोर्न : सहा वेळा चॅम्पियन नोवाक जोकोविच, डॉमिनिक थिएम, मारिया शारापोवा, १९ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसºया फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर कॅरोलिन गार्सिया, एग्निएंजका रदवांस्का यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला.मेलबोर्नच्या तापमानात वाढ झाल्याने खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. जोकोविचने गेल मोनफिल्सला चार सेटमध्ये पराभूत केले. पहिला सेट गमाविल्यानंतर दोन तास चाललेल्या सामन्यात जोकोविचने मोनफिल्सवर ४-६, ६-३, ६-१, ६-३ असा विजय मिळविला. बारा वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या जोकोविचची लढत आता अल्बर्ट रामोस याच्याशी होणार आहे. स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलासने अमेरिकेच्या टीम स्मिजेकला ६-४, ६-२, ७-६ असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली. हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने अमेरिकेच्या सॅम क्वेरीला ६-४, ७-६, ४-६, ६-२ असे पराभूत करीत चांगलीच खळबळ माजवून दिली.आॅस्ट्रेलियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थिएम याने पिछाडी भरून काढत डेनिस कुडला याला पराभूत केले. थिएमने कुडला याच्यावर ६-७, ३-६, ६-३, ६-२, ६-३ अशी मात केली. महिलांच्या गटात शारापोवाने आपला दावा मजबूत करीत तिसरी फेरी गाठली. शारापोवाने अनास्तासिजा सेवास्तोवाला ६-१, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. शारापोवाची लढत एंजेलिक कर्बरशी होण्याची शक्यता आहे. फ्रान्सची आठवी मानांकित कॅरोलिननला झेक गणराज्यच्या मार्केता वोंद्रोसोवावर विजय मिळविताना चांगलेच झुंजावे लागले. तीन सेटपर्यंत लांबलेल्या या सामन्यात तिने ६-७, ६-२, ८-६ असा विजय मिळविला. तिला पुढील फेरीत गर्बाइन मुगुरुजाशी लढावे लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या बर्नाडा पेराने ब्रिटनच्या योहाना कोंटाला ४-६, ५-७ असे पराभूत केले. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने जर्मनीच्या जॉन-लेनार्ड स्टर्फचा ६-४, ६-४, ७-६ (७-४) गुणांनी पराभव करून तिसºया फेरीत प्रवेश केला. पोलंडच्या रदवांस्काला विजय मिळविण्यासाठी तीन सेटपर्यंत वाट पाहावी लागली. युक्रेनच्या लेसिया सुेरेंकाविरुद्ध तिने २-६, ७-५, ६-३ असा विजय संपादन केला. (वृत्तसंस्था)अनुभवी लिएंडर पेस व पुरव राजा यांनी निकोलस बासिलाशविली व आंद्रियास हेदर मोरेर या जोडीचा ६-२, ६-३ असा पराभव केला. त्यांची लढत पाचव्या मानांकित जेमी मरे व ब्रुनो सोरेस या जोडीशी होणार आहे.दिविज व राजीव राम यांच्या जोडीने रोमानियाच्या मारियस कोपिल व सर्बियाच्या व्हिक्टर ट्राइकी या जोडीवर ७-६, ६-४ असा विजय मिळविला. त्यांना आता फाबियो फोगनीनी व मार्सेल ग्रेनोलर्स या जोडीशी दोन हात करावे लागतील.रोहन बोपन्ना व एडवर्ड रॉजर वेस्लीन या जोडीने रेयान हॅरिसन व वासेक पोसपिसिल या जोडीचा ६-२, ७-६ असा पराभव करीत दुसºया फेरीत प्रवेश केला.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनRoger fedrerरॉजर फेडररmaria sharapovaमारिया शारापोव्हा