शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन: सिमोना हालेपला नमवून डेन्मार्कची वोझ्नियाकी बनली चॅम्पियन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 17:33 IST

डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोज्नियाकी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेप हिच्यावर 7-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.

ठळक मुद्देतब्बल दोन तास 50 मिनिटे हा सामना रंगला. दोन्ही खेळाडूंना सामन्यादरम्यान उपचाराची गरज भासली. वोझ्नियाकी ही यापूर्वी 2010 आणि 2011 मध्ये नंबर वन होती.

मेलबर्न- डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोज्नियाकी हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात तिने रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेप हिच्यावर 7-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. यासह जागतिक क्रमवारीत हालेप नंबर वन वरुन पायउतार झाली असून वोझ्नियाकी नवी नंबर वन बनली आहे. वोझ्नियाकीचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.नंबर वन आणि दोघींच्याही पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या दृष्टीने नंबर वन आणि नंबर टू दरम्यान ही प्रतिष्ठेची लढत होती.

त्यात तोडीसतोड संघर्ष पहायला मिळाला. तब्बल दोन तास 50 मिनिटे हा सामना रंगला. दोन्ही खेळाडूंना सामन्यादरम्यान उपचाराची गरज भासली. सामन्याच्या तिसऱ्या व निर्णायक सेटआधी हिट ब्रेक नियम लावण्यात आला. त्यानुसार खेळाडूंना 10.मिनिटे विश्रांती घेता आली. 

या विजयानंतर "माझा आवाज कांपतोय" असे वोझ्नियाकी म्हणाली तर तिचे अभिनंदन करताना हालेप म्हणाली की, कॅरोलने माझ्यापेक्षा चांगला खेळ केला. वोझ्नियाकी ही यापूर्वी 2010 आणि 2011 मध्ये नंबर वन होती. यापूर्वी 2009 व 2014 मध्ये तिला युएस ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 2011 च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती मॅचपॉईंटवरून चीनच्या ली ना कडून पराभूत झाली होती मात्र यंदा तिने विजेतेपद पटकावत त्या कटू आठवणींवर पडदा टाकला. 

यंदा दुसऱ्या फेरीत जाना फेटविरुध्द तिने पराभवाच्या उंबरठ्यावरुन मुसंडी मारली होती. त्या सामन्याच्या निर्णायक सेटमध्ये तिने दोन मॅच पॉईंट वाचवले होते. सिमोनाविरुध्दच्या सात लढतीतील तिचा हा पाचवा आणि सलग चौथा विजय होता. सिमोनाला फ्रेंच ओपनच्या दोन उपविजेतेपदानंतर आता पुन्हा,एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन