शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

Australia Open 2023 : नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले ऑस्ट्रेलियन ओपन; राफेल नदालच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:15 IST

Australia Open 2023 Stefanos Tsitsipas vs Novak Djokovic : नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले.

Australia Open 2023 Stefanos Tsitsipas vs Novak Djokovic : नोव्हाक जोकोव्हिचनेऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले. त्याने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासवर विजय मिळवताना २२वे ग्रँड स्लॅम जिंकले. राफेल नदाल याच्यानंतर २२ ग्रँड स्लॅम जिंकणारा तो दुसरा पुरुष टेनिसपटू ठरला. शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी पाहणाऱ्या या फायनलमध्ये त्सित्सिपासने सर्बियन स्टारला जवळपास तीन तास झुंजवले. नोव्हाकने दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी उचलली. नोव्हाकने ६-३, ७-६ ( ७-४), ७-६ ( ७-५) अशी बाजी मारली.

राफेल नदालचे आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकेल हे स्पष्ट होते. ग्रीसचा २४ वर्षीय स्टेफानोस त्सित्सिपास आणि सर्बियाच्या नोव्हाक यांच्यातल्या सामना चुरशीचा झाला. त्सित्सिपासने २०१९, २०२१ व २०२२च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि यंदा त्याने एक पाऊल पुढे टाकले. जागतिक क्रमवारीत त्सित्सिपास चौथ्या क्रमांकावर आहे, तर नोव्हाक पाचव्या स्थानी आहे. तरीही अनुभवाच्या जोरावर नोव्हाकने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ग्रीसच्या खेळाडूने माजी विजेत्याचा घाम काढला.  टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये नोव्हाक व त्सित्सिपास यांच्यात रॅलीचा चांगला खेळ पाहायला मिळाला. नोव्हाकने हा सेट ७-६ ( ७-४) असा जिंकून २-० अशी आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्येही कडवी टक्कर पाहायला मिळाली. पहिला गेम त्सित्सिपासने जिंकल्यानंतर नोव्हाककडून तितकाच जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडू एकेक गेम घेत होते आणि अशात हाही सेट टाय ब्रेकरमध्ये जाईल असे चित्र दिसत होते. ५-५ अशा बरोबरीनंतर नोव्हाककडे सर्व्हिस आली अन् त्याने काही सेकंदातच ६-५ अशी आघाडी घेतली. त्सित्सिपासनेही पुढील गेम घेत ६-६ अशी बरोबरी मिळवली अन् हाही गेम टाय ब्रेकरमध्ये गेला.

प्रेक्षकांचा उत्साह प्रचंड वाढलेला पाहायला मिळाला अन् चेअर अम्पायरना त्यांना शांत बसण्याचे आवाहन करावे लागले. नोव्हाकने टायब्रेकरमध्ये सलग ३ गुण घेतले. ५-० अशी आघाडी असताना आता नोव्हाक गुण घेत बाजी मारेल असे वाटत असताना त्सित्सिपासने पहिला गुण घेतला. त्यानंतर चांगली रॅली सुरू असताना प्रेक्षकांकडून नोव्हाकची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न झाला अन् त्सित्सिपासला दुसरा गुण मिळाला. २६ फटक्यांची ही रॅली रंगली आणि या मॅचमधील ही सर्वात लांब चाललेली रॅली ठरली.  ३-६ अशा पिछाडीवरून त्सित्सिपासने ५-६ अशी ही टायब्रेकर आणली. पण, नोव्हाकने ७-६ ( ७-५) अशी बाजी मारताना ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. 

ग्रँड स्लॅम विजेतेपदऑस्ट्रेलियन ओपन - 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021, 2023 फ्रेंच ओपन - 2016, 2021विम्बल्डन - 2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022अमेरिकन ओपन - 2011, 2015, 2018 

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच