शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘एआयटीए खेळाडूंच्या बाजूने नव्हते’, महेश भूपतीने व्यक्त केली निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 04:12 IST

‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला.

मुंबई : ‘डेव्हिस चषक लढतीसाठी पाकिस्तान दौऱ्याबाबत खेळाडूंनी चिंता व्यक्त केली त्यावेळी टेनिस महासंघ व सरकारने त्यांना अधांतरी सोडले होते,’ असा आरोप माजी कर्णधार महेश भूपतीने गुरुवारी केला.राष्टÑीय महासंघाने मला निलंबित करण्यासाठी जी पद्धत अवलंबली त्यातून मी अद्याप सावरलो नसल्याचे सांगून भूपती म्हणाला, ‘गेल्या दोन दशकापासून एआयटीएच्या वागणुकीने मी मुळीच आश्चर्यचकित नाही. पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून दोन्ही देशात तणाव आहे. अनेक वर्षांपासून कुठल्याही संघाने खेळासाठी त्या देशाचा दौरा केला नसताना एआयटीए खेळाडूंवर तेथे खेळण्यास दडपण आणत आहे.’‘जगात कुठेही पाकला पराभूत करु’भारतीय क्रिकेट संघावर पाक दौरा करण्याची वेळ आली असती तर अनेक खासदारांनी संसदेत आवाज उठवला असता. टेनिसबाबत असे करण्यासाठी कुणालाही वाटले नाही. टेनिसचे भारतात किती महत्त्व आहे, हे यावरुन सिद्ध झाल्याचे मत भूपतीने व्यक्त केले. पाकविरुद्ध भारत सहज जिंकेल, असा त्याने दावाही केला. तो म्हणाला,‘ भारताला जगात कुठेही पाकला नमविताना त्रास जाणवणार नाही. कुठेही खेळलो तरी पाकला हरवूच.’

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारत