माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:29 AM2020-12-21T11:29:09+5:302020-12-21T11:31:15+5:30

शनायाची भूमिका रसिका सुनिल साकारत असून तिला या मलिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण ती पुन्हा एकदा आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

rasika sunil aka shanaya will exit from Majhya Navryachi Bayko? | माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेला रसिका सुनील ठोकणार रामराम?

googlenewsNext
ठळक मुद्देआता पुढील काही भागांमध्ये शनाया आणि तिच्या या पूर्वप्रियकराचे लग्न दाखवण्यात येणार आहे आणि शनाया त्याच्यासोबत परदेशात स्थायिक होणार असल्याचे मालिकेत दाखण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला गेल्या काही वर्षात प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सगळयाच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यातही शनाया तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. गॅरीने धोका दिल्यानंतर ती आता त्याला चांगलाच धडा शिकवत आहे. गॅरीची पहिली पत्नी राधिका आणि तिची तर आता घट्ट मैत्री झाली आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. या मालिकेच्या कथानकाला आता ट्विस्ट मिळणार असून शनाया हे पात्र लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. रसिका सुनीलला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असल्याने तिचे फॅन्स तिला मिस करणार यात काहीच शंका नाही. 


शनायाची भूमिका रसिका सुनिल साकारत असून तिला या मलिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. गेल्या काही महिन्यांपूर्वी रसिकाने ही मालिका सोडली होती. ती परदेशात शिकायला गेल्यामुळे तिची जागा इशा केसकरने घेतली होती. पण शनाया म्हणून प्रेक्षकांची नेहमीच पहिली पसंती रसिकालाचा मिळाली. पण आता ती पुन्हा मालिका सोडणार का असा प्रश्न सगळ्याना पडला आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सध्या शनाया आरजे बनली आहे. ती बिंदू राणी बनून लोकांना रिलेशनशिपविषयी टिप्स देत आहे आणि यातच तिचा एक्स बॉयफ्रेंड पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला आहे. आता पुढील काही भागांमध्ये शनाया आणि तिच्या या पूर्वप्रियकराचे लग्न दाखवण्यात येणार आहे आणि शनाया त्याच्यासोबत परदेशात स्थायिक होणार असल्याचे मालिकेत दाखण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. या कथानकानुसार शनायाचे पात्र या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडल्यावर तिची जागा इशाने घेतली होती. पण आता शनायाच्या भूमिकेत दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला न घेता हे पात्रच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात आहे. माझ्या नवऱ्याची बायकोमधून शनायाची एक्झिट झाल्यानंतर रसिकाच्या फॅन्सची काय प्रतिक्रिया असेल हे काही दिवसांतच कळेल. 

Web Title: rasika sunil aka shanaya will exit from Majhya Navryachi Bayko?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.