High TRP Marathi Serials : क्या बात है...! TRPच्या टॉप ५ मध्ये झाली झी मराठीच्या या मालिकेची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 12:43 PM2019-08-03T12:43:01+5:302019-08-03T12:43:30+5:30

दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात.

Aggabai Sasubai serial enter in TRP top 5 Ratings | High TRP Marathi Serials : क्या बात है...! TRPच्या टॉप ५ मध्ये झाली झी मराठीच्या या मालिकेची एन्ट्री

High TRP Marathi Serials : क्या बात है...! TRPच्या टॉप ५ मध्ये झाली झी मराठीच्या या मालिकेची एन्ट्री

googlenewsNext

दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. 'तुला पाहते रे' मालिका जवळपास एक वर्षे चालली आणि त्या काळात मालिका टीआरपीमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान कायम ठेवलं होतं. इतकंच नाही तर मालिकेच्या शेवटच्या आठवड्यातही मालिका टॉप ५मध्ये होती. या मालिकेच्या जागी प्रसारीत होणारी मालिका 'अग्गंबाई सासूबाई'देखील टीआरपीच्या रेसमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिने 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर आहे.

मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे हे टीआरपीच्या आकड्यांवरुन लक्षात येतंय.


२०१९च्या ३०व्या आठवड्याचं टीआरपी रेटिंग बघता मराठीत पहिल्या क्रमांकावर झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिका आहे. ही मालिका सुद्धा गेले तीन वर्ष हे पहिलं स्थान काही केल्या सोडत नाही. आता तर मालिकेत नवीन वळण आल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. तर या चार्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आहे.

तर तिसरा क्रमांक चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्नने मिळवलाय. चला हवा येऊ द्याला लागलेली सेलिब्रिटींच्या विनोदाची धमाल सगळेच एन्जॉय करत आहेत.

यामध्ये चौथं स्थान स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचं आहे. 

Web Title: Aggabai Sasubai serial enter in TRP top 5 Ratings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.