शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

संगीत प्रेमींनो, तयार रहा! युट्युबमध्ये येत आहेत दोन नवीन फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 14:57 IST

YouTube new feature: युट्युबवर आता लूपवर व्हिडीओज बघता येतील तसेच क्लिप्स देखील बनवता.  

युट्युबचा वापर सध्या मोठ्याप्रमाणावर केला जात आहे. काही लोक यावर माहितीपूर्ण व्हिडीओज बघतात तर काही करमणुकीसाठी युट्युबचा वापर करतात. बऱ्याचदा युट्युबचा वापर गाणी ऐकण्यासाठी देखील केला जातो. पण जर एखादं गाणं जर आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायचे असेल तर? युट्युबवर पुन्हा पुन्हा एकच व्हिडीओ आपोआप बघता येईल, अशी सोय नाही. पण गुगलच्या मालकीची हि कंपनी यासाठी ‘व्हिडीओ ऑन लूप’ हे फिचर घेऊन येणार आहे. (Video on loop and clip videos features will come to YouTube android app soon) 

ड्रॉइडमेज नावाच्या एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या फिचरची चाचणी अँड्रॉइडवर केली जात आहे. परंतु युट्युबकडून हे फिचर कधी येईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.  

युट्युब दोन नवीन फिचर घेऊन येणार आहे. यातील पहिले फिचर व्हिडीओ लूपमध्ये म्हणजे, एकदा व्हिडीओ संपला कि पुन्हा तोच व्हिडीओ प्ले करण्यास मदत करेल. हा पर्याय युट्युबच्या डेस्कटॉप व्हर्जनवर उपलब्ध होई, परंतु मोबाईल अ‍ॅपमध्ये दिसत नाही. लवकरच तीन डॉट्सच्या मेनूमध्ये या फीचरचा समावेश केला जाईल.  

‘क्लिप व्हिडीओज’ हे युट्युबच्या अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये येणाऱ्या नवीन फीचरचे नाव आहे. नावाप्रमाणे  फीचरच्या मदतीने व्हिडीओजच्या क्लिप बनवता येतील. या क्लिप्सची वेळ मर्यादा 60 सेकंदाची असेल. याचा वापर करून बनवण्यात आलेल्या क्लिप्स शेअर करता येतील. या टूलसाठी कैचीचे चिन्ह व्हिडीओ खाली दिसू लागेल.  

काही दिवसांपूर्वी युट्युबने घोषणा केली होती कि 1 जूनपासून काही नियमांमध्ये बदल केले जातील. यानुसार युट्युबवरील वापरकर्त्यांना एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांचा चेहरा असलेले व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. तसेच जरी एखादा क्रिएटर युट्युबच्या पार्टनर प्रोग्रामचा भाग नसला तरी त्याच्या त्याच्या व्हिडीओवर जाहिराती देण्याचा अधिकार कंपनीला असेल.  

टॅग्स :YouTubeयु ट्यूबSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड