शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi च्या दुसऱ्या ब्रँडचा Poco M3 स्मार्टफोन लाँच; लगेचच 1000 चा डिस्काऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 14:13 IST

Poco M3 smartphone launched: पोको ही कंपनी शाओमीने भारतीय बाजारासाठी वेगळी केली आहे. 2018 मध्ये पोकोचा पहिला फोन लाँच झाला होता.

Xiaomi चा दुसरा ब्रँड Poco ने भारतीय बाजारात 48 मेगापिक्सल कॅमेराचा कमी किंमतीतला Poco M3 स्मार्टफोन लाँच केला आहे. पोको एम 2 च्या यशानंतर कंपनीने हा फोन आज लाँच केला. 

Poco M3 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 देण्यात आला आहे. 128 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. वेगवेगळ्या रंगामध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर पोकोने पोको एम सिरीज लाँच केली होती. नोव्हेंबरमध्ये Poco M2 आणि Poco M2 Pro लाँच करण्यात आले होते. 

पोको ही कंपनी शाओमीने भारतीय बाजारासाठी वेगळी केली आहे. 2018 मध्ये पोकोचा पहिला फोन लाँच झाला होता. पोको एम 3 हा कंपनीचा या सिरीजमधला तिसरा फोन आहे. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. 6GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 9 फेब्रुवारीपासून विक्री सुरु केली जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1000 तत्काळ डिस्काऊंट मिळणार आहे. 

स्पेसिफिकेशनपोको एम3 मध्ये ड्युअल सिम, MIUI 12 असलेले Android 10,  6.53 इंचाची फुल एचडी प्लस स्क्रीन, 1,080x2,340 pixels रिझोल्युशन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे. पाठीमागे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगा पिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगा पिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगा पिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. 

हा फोन कूल ब्ल्यू, पोको यलो आणि पावर ब्लॅक अशा रंगात उपलब्ध आहे. या फोनची स्टोरेज स्पेस 512GB पर्यंत वाढविण्यात येऊ शकणार आहे. फोनला 6,000mAh ची बॅटरी 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. फोनचे वजन 198 ग्रॅम आहे. साईडला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. USB Type-C देण्यात आला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइल