शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

Xiaomi भल्याभल्यांना रडवणार! Redmi Note 9 5G स्मार्टफोन 15000 रुपयांत लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 10:48 IST

Xiaomi 5G Smartphones: रेडमीने चीनमध्ये  Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G हे दोन ५जी फोन लाँच केले आहेत.

चीनची तगडी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ही वनप्लस, अॅपलसारख्या भल्याभल्या कंपन्यांना रडवणार आहे. शाओमीचा ब्रँड रेडमीने Redmi Note 9 5G चे दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. याची किंमत पाहूनच स्वस्तात 5जी फोनची सुरुवात करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांत मोटरोलाही स्वस्तातील ५जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. 

रेडमीने चीनमध्ये  Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G हे दोन ५जी फोन लाँच केले आहेत. तर Redmi Note 9 4G हा फोनही लाँच केला आहे. Redmi Note 9 5G च्या 6GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 1299 Yuan म्हणजेच 14573.90 रुपये एवढी कमी आहे. तर Redmi Note 9 Pro 5G ची किंमत 1599 Yuan म्हणजेच 17,944.19 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारातील किंमतीचा विचार केल्यास ती 15 ते 20 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. 

Redmi Note 9 5G च्या 8 GB RAM + 128GB व्हेरिअंटची किंमत 1550 Yuan म्हणजे 16,818.53 रुपये तर 8 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1699 yuan म्हणजे 19,063 रुपये ठेवण्यात आली आहे.  Redmi Note 9 Pro 5G चे देखील रेडमीने तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. यामध्ये 6 GB RAM + 128 GB व्हेरिअंटची किंमत 16,818 रुपये. 8 GB RAM + 128 GB व्हेरिअंटची किंमत 20,187 रुपये आणि 8 GB RAM + 256 GB व्हेरिअंटची किंमत 22,428 रुपये ठेवण्यात आली आहे. 

Redmi Note 9 5G मध्ये काय़ काय? रेडमीचे हे नवीन फोन जगातील स्वस्त ५जी स्मार्टफोन आहेत. सध्या वनप्लसकडेच 25 ते 29000 च्या किंमतीतला ५जी फोन आहे. तर मोटरोला येत्या 30 नोव्हेंबरला भारतात स्वस्त ५जी फोन लाँच करणार आहे. यामुळे चिनी कंपन्यांमध्येच मोठे किंमत युद्ध रंगणार आहे. Redmi Note 9 5G मध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देण्यात आला आहे. 6.53 इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले,  13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 48-8-2 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5000 एमएएचची बॅटरी जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 

टॅग्स :xiaomiशाओमीchinaचीनMobileमोबाइल