शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

शिओमी रेडमी नोट ४ च्या मूल्यात कपात, आता मिळणार 10 हजार 999 रूपयात

By शेखर पाटील | Updated: January 24, 2018 10:54 IST

शिओमी कंपनीने आपल्या तुफान लोकप्रिय ठरलेल्या रेडमी नोट ४ या मॉडेलच्या ४ जीबी रॅमयुक्त व्हेरियंटचे मूल्य एक हजार रूपयांनी कमी करण्याचे जाहीर केले आहे.

शिओमी रेडमी नोट ४ या स्मार्टफोनने लोकप्रियतेचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. अत्यंत किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने युक्त असणार्‍या या मॉडेलला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. हे मॉडेल २ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज. ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. मध्यंतरी याच्या दोन्ही व्हेरियंटचे मूल्य एक हजारांनी कमी करण्यात आले होते. यातील ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य पुन्हा एकदा एक हजार रूपयांनी कमी करण्यात आला आहे. अर्थात हे व्हेरियंट आता ग्राहकांना फक्त १०,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. तर २ आणि ३ जीबी रॅमचे व्हेरियंट आधीच्याच म्हणजे ८,९९९ आणि ९,९९९ रूपयात उपलब्ध आहेत.

फिचर्सचा विचार केला असता, शिओमी रेडमी नोट ४ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो या प्रणालीवर चालणारे असून यात ४१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. यातील कॅमेरे हे १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणार्‍या या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानxiaomiशाओमीMobileमोबाइल