शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

Redmi Note 11T 5G: रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध; फोनमध्ये 50MP कॅमेरा, 11GB RAM आणि 5000mAh बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Updated: December 7, 2021 11:48 IST

Redmi Note 11T 5G Phone: 7 डिसेंबरपासून Redmi Note 11T 5G स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. या फोनमध्ये कंपनीनं 11GB RAM, 5000mAh Batttery, 50MP Rear Camera, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जींग असे भन्नाट फिचर दिले आहेत.

शाओमीनं गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला सर्वात स्वस्त 5G Phone सादर केला होता. आज म्हणजे 7 डिसेंबरपासून Redmi Note 11T 5G स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होईल. या फोनमध्ये कंपनीनं 11GB RAM, 5000mAh Batttery, 50MP Rear Camera, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जींग असे भन्नाट फिचर दिले आहेत. असे असूनही हा फोन 15,000 रुपयांच्या आत विकत घेता येईल.  

Redmi Note 11T 5G Price In India  

या स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. रेडमी नोट 11टी 5जी स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु या किंमतीवर 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहेत. यातील 1000 रुपयांची सूट लाँच ऑफर अंतर्गत कंपनी देत आहे. तर ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय ट्रँजॅक्शनवर ग्राहकांना 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स       

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू दिला आहे.  

त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. डिवाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम फिचर दिला आहे. या फिचरच्या मदतीने अतिरिक्त 3GB रॅम वाढवता येतो, त्यामुळे एकूण रॅम 11GB होतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. 

रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान